हॉटेलमध्ये कर्मचाऱ्यांना मारहाण भोवली; तीन मद्यपी पोलीस निलंबित

हॉटेलमध्ये गोंधळ घालणाऱ्या पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पब व्यवस्थापक कुणाल दशरथ मद्रे (वय २७, रा. घोरपडी) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तिघांच्या विरोधात मारहाण आणि मुंबई दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मठपती हे फरासखाना पोलीस ठाणे, गायकवाड हे चंदननगर पोलीस ठाणे आमि जाधव हे समर्थ वाहतूक विभागात नियुक्तीस आहेत. मुंढवा परिसरातील मेट्रो लाऊंज हॉटेलमध्ये मद्रे व्यवस्थापक आहे.

    पुणे – मुंढवा (Mundhwa) भागातील एका हॉटेलमध्ये शहर पोलीस दलातील तीन पोलिसांनी (Pune Police) गोंधळ घातला. या प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल (Crime File) करण्यात आला असून त्यांना पोलीस दलातून निलंबित (Police Suspended) करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस शिपाई उमेश मरीस्वामी मठपती (वय २९, रा. सोमवार पेठ), अमित सुरेश जाधव (वय ३७, रा. भवानी पेठ), योगेश भगवान गायकवाड (वय ३२ , रा. केशवनगर) अशी त्यांची नावे आहेत.

    हॉटेलमध्ये गोंधळ (Fights) घालणाऱ्या पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पब व्यवस्थापक कुणाल दशरथ मद्रे (वय २७, रा. घोरपडी) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तिघांच्या विरोधात मारहाण आणि मुंबई दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मठपती हे फरासखाना पोलीस ठाणे, गायकवाड हे चंदननगर पोलीस ठाणे आमि जाधव हे समर्थ वाहतूक विभागात नियुक्तीस आहेत. मुंढवा परिसरातील मेट्रो लाऊंज हॉटेलमध्ये मद्रे व्यवस्थापक आहे.

    सोमवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास मद्रे हॉटेल बंद करत होते. त्यावेळी पोलीस शिपाई मठपती, जाधव, गायकवाड तेथे आले. तिघांनी दारु प्यायली. त्यानंतर तिघांनी पुन्हा दारू मागितली असता मद्रे यांनी हॉटेल बंद झाल्याचे सांगून देण्यास नकार दिला असे हॉटेलमधील कर्मचारी रोहित काटकर याने सांगितले. दरम्यान, तिघांनी काटकरला मारहाण केली. मद्रे यांनी तिघांना तेथून जाण्यास सांगितले. तेव्हा तिघांनी मद्रे यांना धमकावले. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.