गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; दोन नक्षलवाद्यांचा खात्मा

अहेरी तालुक्यात नक्षल्यांच्या हालचाली सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर गडचिरोली पोलीस दलाच्या सी-६० पथकाचे जवान आणि छत्तीसगडच्या बिजापूर पोलिसांनी त्या भागात नक्षलविरोधी अभियान राबवले. पोलीस दिसताच नक्षल्यांनी गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. यात दोन नक्षलवादी ठार झाले.

    नागपूर : दक्षिण गडचिरोली (Gadchiroli) परिसराला लागून असलेल्या छत्तीसगड (Chhattisgarh) राज्याच्या सीमावर्ती भागात आज सकाळी पोलिसांशी झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी (Naxalist) ठार झाले. मृतांमध्ये नक्षलवाद्यांच्या विभागीय समितीची सदस्य असलेल्या एका महिलेचाही समावेश आहे. अहेरी तालुक्यातील दामरचा गावापलीकडे छत्तीसगड राज्याची सीमा प्रारंभ होतो.

    अहेरी तालुक्यात नक्षल्यांच्या हालचाली सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर गडचिरोली पोलीस (Gadchiroli Police) दलाच्या सी-६० पथकाचे जवान आणि छत्तीसगडच्या बिजापूर पोलिसांनी त्या भागात नक्षलविरोधी अभियान राबवले. पोलीस दिसताच नक्षल्यांनी गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. यात दोन नक्षलवादी ठार झाले.

    चकमकीत ठार झालेल्या दोघांचेही मृतदेह (Naxalist Death) पोलिसांनी ताब्यात घेतले असून, मृतांमध्ये नक्षल्यांच्या विभागीय समितीची सदस्य असलेल्या एका महिलेचाही समावेश आहे. तिच्याकडून एक बंदूक ताब्यात घेतल्याचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी सांगितले. परिसरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.