Pregnant women without SEX cycle; The doctor found the answer in the medical checkup

अवैध गर्भपात प्रकरणात आरोपी असलेल्या एका महिलेचा बीड परिसरातील पाली येथील तलावात मृतदेह आढळला आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे(Excitement over finding body of accused woman in Illegal Abortion Case in Beed).

  बीड : अवैध गर्भपात प्रकरणात आरोपी असलेल्या एका महिलेचा बीड परिसरातील पाली येथील तलावात मृतदेह आढळला आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे(Excitement over finding body of accused woman in Illegal Abortion Case in Beed).

  सीमा डोंगरे असे मृत महिलेचे नाव आहे. सीमावर अवैध गर्भपात प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. आज पहाटे सदर महिलेवर गुन्हा दाखल झाल्यानंतर पाली येथील तलावात सिमा डोंगरे या महिलेचा मृतदेह आढळले आहे. ती बीडच्या डीपीरोड भागातील रहिवासी होती. काही महिन्यांपूर्वी पर्यंत ती नर्सचे काम करीत होती. दरम्यान हा खून आहे की आत्महत्या? याचा तपास पोलीस करत आहेत.

  अवैध गर्भपात प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आणि एजंट असलेल्या अंगणवाडी सेविका असणाऱ्या मनीषा सानप हिच्याकडे तब्बल २९ लाखांची रोकड सापडली आहे. यामध्ये ५०० च्या दोन हजार रूपयांच्या नोटांचे बंडल सापडले आहेत. तसेच जमीन, कोट्यावधींचे बंगलेही तिच्या नावावर आहेत.

  एजंटांकडे एवढे पैसे म्हणल्यावर मुख्य सुत्रधाराकडे किती असतील? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. या प्रकरणात पोलिसांनी पती, सासरा, भाऊ, मनिषा सानप नावाची अंगणवाडी सेविका, लॅबवाला, नर्स यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या प्रकरणात पाच जणांविरोधात रात्री उशिरा पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

  दरम्यान, काल रात्री अवैध गर्भपात प्रकरणात ताब्यात घेतलेल्या, महिला एजंट मनीषा सानपच्या गेवराई शहरातील आलिशान बंगल्यावर छापेमारी करण्यात आली. यावेळी तिच्या बंगल्यात गर्भपात करण्यासाठी लागणारं साहित्य, त्याचबरोबर सोनोग्राफी करण्यासाठी लागणारं जेल यासह इतर साहित्य देखील सापडले.

  मृत शीतल गाडेचे देखील गर्भलिंग निदान याच बंगल्यात करण्यात आले होत. तर यासाठी ४५ ते ५० हजार रुपये घेतले जात होते, अशी माहिती बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी दिली आहे. विशेष म्हणजे मृत महीलेचा गर्भपात हा तिच्या शेतातील एका गोठ्यात करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मंगळवारी दिवसभर गेवराई डेरेदाखल असणारे आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासन आज बक्करवाडी येथील गर्भपात केलेल्या गोठ्याची पहाणी करणार आहेत.