नालासोपाऱ्यात भाजप कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला

नालासोपारा पूर्वेचे भाजप कार्यकर्ते अरुण श्रीवास्तव यांच्या कार्यालयात घुसून त्यांना ४ ते ५ अज्ञात समांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्यात, हातावर वार केल्याने त्यांना गंभीर इजा झाली आहे. स्थानिकांच्या मदतीने त्यांना जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.

    वसई : नालासोपाऱ्यात (Nalasopara) भाजप कार्यकर्त्यांवर (BJP Activist) चार ते पाच अज्ञात इसमांनी धारदार शस्त्राने हल्ला (Fatal Attack) केल्याची घटना रात्री घडली. नालासोपारा पूर्वेचे भाजप कार्यकर्ते अरुण श्रीवास्तव यांच्या कार्यालयात घुसून त्यांना ४ ते ५ अज्ञात समांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्यात, हातावर वार केल्याने त्यांना गंभीर इजा झाली आहे.

    स्थानिकांच्या मदतीने त्यांना जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. नालासोपाऱ्यात अमली पदार्थ विकणाऱ्यांविरोधात (Drug Supplier) अरुण श्रीवास्तव (Arun Shrivastav) यांनी पोलीस ठाण्यात पत्रव्यवहार केले होते. याचाच मनात राग धरुन हा हल्ला केला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तुळींज पोलिसांनी या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध घेतला जात आहे.