8 वर्षांची मुलगी मागायची खेळणी आणि चॉकलेट, संतापलेल्या बापाने निर्घृणपणे दगडाने ठेचून हत्या केली!

ती मुलगी नेहमी चॉकलेट आणि खेळणी मागायची. त्यामुळे 37 वर्षीय या सनकी पित्याने अत्यंत क्रूरपणे मुलीचे डोके दगडाने ठेचून तिची हत्या केली

  देशात दिवसेंदिवस गुन्हे वाढताना दिसत आहे. आधी दिल्लीत प्रियकराने आपल्या प्रेयसीची अतिशय क्रूरपणे हत्या (Delhi Murder Case) केली त्यानंतर गुजरातच्या सुरतमध्येही घरगुती () भांडणातुन बापाने त्याच्या मुलीवर चाकूने वार करत हत्या केली होती. आता मध्यप्रदेशमध्येही असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. इंदूरमध्ये चॉकलेट आणि खेळणे मागते म्हणून एका बापाने आपल्याच मुलीची निर्घृण हत्या केली. आरोपी हा आधीपासूनच ड्रग्ज अॅडिक्ट असून तीन वर्षांपूर्वी त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती. या घटनेमुळ परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

  नेमकं काय घडलं

  मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये ही धक्कादायक घटना समोर आली आहे. एका आठ वर्षाच्या निष्पाप मुलीची तिच्या वडिलांनीच निर्घृण हत्या केली, कारण ती चॉकलेट आणि खेळणी मागायची. 37 वर्षीय या सनकी पित्याने अत्यंत क्रूरपणे मुलीचे डोके दगडाने ठेचून तिची हत्या केली. पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली वडिलांना अटक केली आहे. अटक केल्यानंतर आरोपीने सांगितले की, त्याने मुलीला बांधकाम सुरू असलेल्या घरात नेऊन दगडाने ठेचून मारले.  त्याची परिस्थिती हलाखिची होती. मुलगी नेहमी चॉकलेट घेऊन मागायची. ज्यामुळे तो अस्वस्थ झाला होता. ‘या त्रासातून सुटका हवी असल्याने त्याने शनिवारी रात्री आपल्या मुलीची हत्या केली.’  असं त्याने पोलिसांना सांगितले. तसेच, तिला एका निर्माणाधीन इमारतीत नेले आणि तिचे डोके फरशा आणि दगडांनी ठेचून तिची हत्या केल्याचही कबूली त्याने दिली.

  आरोपीची पत्नी तीन वर्षांपूर्वी त्याला सोडून गेली होती, तर त्याची आई इंदूरमधील मंदिराजवळ भीक मागायची. एका अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीकडून एक मतदार ओळखपत्र जप्त करण्यात आले आहे, परंतु त्याच्याकडे कोणतेही रेशनकार्ड सापडले नाही.

  गुजरातमध्येही बापाने मुलीला केला खून

  गुजरातच्या सुरतमध्ये घरगुती वादातून एका व्यक्तीने आपल्या 19 वर्षीय मुलीवर चाकूने अनेक वार केल्याच घटना घडली होती. यात मुलीचा जागीच मृत्यू झाला. (Surat Murder News) मुलीला वाचवायला आलेल्या पत्नीवरही याने चाकूने हल्ला केला. आरोपीने आपल्या मुलीला पकडून तिच्यावर अनेक वेळा वार केले. तिचा जीव वाचवण्यासाठी त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत ती जवळच्याच एका खोलीत शिरली. तो तिचा पाठलाग करत तिथही गेला आणि तिची हत्या केली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. आरोपी पित्याला अटक करण्यात आली आहे.