
मुलीच्या कुटुबिंयाकडुन झालेल्या मारहाणीमुळे उधा अहिरवार यांनी गळफास लावून घेतल्याचे पोलिसांचे मत आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
छतरपूर : मुलांच्या प्रेमप्रकरणामुळे त्यांच्या कुटुंबियांना समाजात त्रास सहन करावा लगतो. अशा कितीतरी घटना यापुर्वी समोर आल्या आहेत. ज्या घटनेत मुलांच्या प्रेमप्रकरणामुळे कुटुंबामध्ये वाद निर्माण होतो. मात्र, मधे घडलेल्या एका घटनेत मुलाच्या प्रेमप्रकरणामुळे त्याच्या वडिलांंना जीव गमवावा लागल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. छतरपूर जिल्ह्यातील बिला गावातील एका वृद्धाला बांधून मारहाण केल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी तपास केला असता त्याच्या कुटुंबीयांनी त्याच खुन झाल्याला आरोप केला आहे. नेमकं काय आहे प्रकरण बघुया.
गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
मुलीच्या कुटुंबियांवर हत्येचा आरोप
मुलीच्या मुलगी बेपत्ता झाल्यानंतर संतापलेले मुलीचे वडील कल्लन अहिरवार यांनी बिल्ला गावात राहणाऱ्या मुलाचे वडील उधा अहिरवार यांना जबाबदार धरले. त्यांनतर दोन्ही कुटुंबातील वाद टोकाला गेला आणि कल्लान व अन्य पाच जणांनी उधा अहिरवार यांन बेदम मारहाण केली. अत्यंत निर्घृणपणे मारहाण केल्यानंतर त्यांना सोडण्यात आले. दोन दिवसांनंतर उधा अहिरवार यांचा मृतदेह बिला गावात त्यांच्या घरातील खोलीतून सापडला. उधाची पत्नी सावित्रीने आरोप केला आहे की, आरोपींनी घरात घुसून तिला फासावर लटकवले.
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
मुलीच्या कुटुबिंयाकडुन झालेल्या मारहाणीमुळे उधा अहिरवार यांनी गळफास लावून घेतल्याचे पोलिसांचे मत आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या प्रकरणी बच्चन चौकी पोलिसांनी कलन आणि इतर पाच जणांविरुद्ध कलम ३०६ अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. चांदला पोलीस ठाण्याचे प्रभारी अतुल दीक्षित यांनी सांगितले की, प्रथमदर्शनी हत्येचे प्रकरण समोर येत नाही. तरीही पोलीस सर्व मुद्यांचा तपास करत आहेत. मात्र, दरम्यान एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये उधा अहिरवार बांधलेले दिसत आहेत.