Five members of a family drowned in Dombivali

डोंबिवली जवळच असलेल्या संदप  गावात खदानी मध्ये कपडे धुण्यासाठी आलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून  मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली. या मृत्यूला पाणी टंचाईची समस्या कारणीभूत असल्याचा आरोप केला जात आहे(Five members of a family drowned in Dombivali).

    संदप गावासह आसपासच्या देसले पाडा, भोपर आदी परिसरात पाणी टंचाई आहे त्यामुळे या भागातील नागरिक संदप  गावातील खदानी मध्ये कपडे धुण्यासाठी येत असतात. आज सायंकाळच्या सुमारास देसले पाडा येथील गायकवाड कुटुंबातील दोन महिला व तीन मुले या खदानी मध्ये कपडे धुण्यासाठी आले.त्यावेळी ही दुर्दैवी घडली.

    या पाच जनांमधील एक जण बुडत असावा व त्यांना वाचवण्यासाठी उर्वरित चार जण पुढे आले व या प्रयत्नात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली या पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढले. मानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून हे मृतदेह शास्त्रीनगर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

    अपेक्षा गायकवाड 30, मीरा गायकवाड 55, मयुरेश गायकवाड 15, मोक्ष गायकवाड 13, निलेश गायकवाड 15 अशी मयताची नावे असून हे सर्व देसलेपाडा येथील राहणारे होते. त्यामुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात असून या भागातील पाणीटंचाई किती गंभीर आहे याची दाहकता प्रकर्षाने समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून गायकवाड कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.