घरासमोर खेळणाऱ्या पाच वर्षिय मुलीला शेजाऱ्याने नेलं शेतात, दारू पाजून केला अत्याचार, प्रायव्हेट पार्टमध्ये घातला ऊस!

यापूर्वी मुलीला बाराबंकी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना लखनौला रेफर करण्यात आले.

    नुकतचं केरळमध्ये एका पाच वर्षीय चिमुकलीवर तरुणाने अत्याचार करुन तिची हत्या केल्याची घटना समोर आली होती. या घटनेवरुन केरळमध्ये एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणातील आरोपील कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे. ही घटना ताजी असतानाच, आता उत्तर प्रदेशमधून अशीच एक घटना समोर येत आहे. बाराबांकी येथे अवघ्या पाच वर्षाच्या मुलीवर शेजाऱ्याने शेतात नेऊन शारिरिक अत्याचार  (Barabanki Rape News) केल्याची घटना समोर आली आहे. या नराधमाने त्या मुलीला दारुही पाजली आणि तिच्या प्रायव्हेच पार्टमध्ये  ऊसही घातला. गंभीर अवस्थेत असलेल्या मुलीवर सध्या लखनौतील रुग्णालायत उपचार सुरू आहेत.

    मुलगी घराजवळून खेळताना गायब

    25 जुलैला ही घटना घडल्याची माहिती आहे. संध्याकाळी ४ च्या सुमारास घराजवळ नेहमीच्या ठिकाणी खेळणारी 5 वर्षीय मुलगी परिसरातून अचानक गायब झाली होती. बराच वेळ होऊनही ती घरी न आल्याने तिच्या कुटुंबियांसह गावकऱ्यांनी तिचा शोध सुरू केला असता तिच्या सोबत खेळणाऱ्या मुलाने सांगितले की, त्याचे वडील त्या मुलीला शेताकडे घेऊन गेले. तिची आई आणि गावकऱ्यांनी सगळीकडे शोध घेतला असता तलावाशेजारी ती चिमुकली गंभीररित्या जखमी असलेल्या अवस्थेत आढळली.

    मी मुलीचा गळा दाबून तिला तलावात फेकून दिले –  आरोपीची कबुली

    आरोपीचे वय सुमारे 40 वर्षे आहे. तो मुलीच्या घराजवळ राहत असून तिचे कुटुंबिया त्याला ओळखतात.  मुलीचे कुटुंबीय तिचा शोध घेत असताना आरोपीचं नाव समोर आल्यावर पोलिसांसह गावकऱ्यांनी त्याला घेरले. त्याला विचारले असता मुलीला उसाच्या शेतात घेऊन गेल्याची कबुली आरोपीने दिली. नशेत त्याने मुलीच्या आईला सांगितले की, तुमची मुलगी खूप ओरडते. मी तिला पकडले तेव्हाही ती जोरजोरात रडत होती. म्हणूनच मी त्याचा गळा दाबून तलावात फेकून दिले.

    मुलीची प्रकृती अद्याप स्थिर नाही

    त्या नराधमाने मुलीचा गळा दाबून तिला फेकून दिले होते मात्र ती जिवंत होती. बेशुद्ध पडली होती. संपूर्ण शरीर ओले आणि तिच्या शरीराच खालच भाग रक्ताने माखलेला होता. मुलीला त्या अवस्थेत पाहिल्यावर गावकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. पोलिसांनी तात्काळ तिला बाराबंकी रुग्णालयात पाठवले. मात्र, तिची प्रकृती गंभीर झाल्याने तिला लखनौला रेफर करण्यात आले.

    या घटनेला 10 दिवस उलटून गेले आहेत. मुलगी अजूनही रुग्णालयात दाखल आहे. तिचे ऑपरेशन झाले आहे. अजून एक ऑपरेशन करायचे आहे. मात्र, तिच्या प्रायव्हेट पार्ट गंभीररित्या जखमी झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. तिची प्रकृती अद्याप स्थिर नाही.