In front of the police station, the young man set it on fire; Shocking scene in front of Wagholi police station; The condition of the youth is alarming

मुंबईच्या उपनगरीय गोवंडीमध्ये 10,000 रुपयांचे जेवणाचे बिल देण्यावरून झालेल्या वादातून एका 18 वर्षीय तरुणाची त्याच्या चार मित्रांनी हत्या केली.

    मुंबई : क्षुल्लाक गोष्टीवरुन गंभीर गुन्हे घडण्याचं प्रमाण अलीकडे वाढल्याचं दिसत आहे. मुंबईत वाढदिवसाच्या पार्टीवरुन (Birthday Party) झालेल्या राड्यात एकाने जीव गमावल्याची घटना घडली आहे. वाढदिवसाच्या पार्टीचे जेवणाचे बिल 10 हजार रुपये आल्याने मित्रांमध्ये वाद झाला. नंतर एकाने स्वतःच्या खिशातून पैसे देऊन प्रकरण मिटवले. मात्र, झालेला वाद डोक्यातच ठेवून चार आरोपींनी आणखी एका वाढदिवसाच्या पार्टीत केक खाऊन त्या मित्राची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. यासोबतच दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

    नेमका प्रकार काय

    मिळालेल्या माहितीनुसार, चार मित्रांनी आपल्याच मित्राची हत्या केली आहे. मुंबईच्या गोवंडीमध्ये ही घटना झाल्याची माहिती समोर आली आहे. 10,000 रुपयांचे जेवणाचे बिल देण्यावरून झालेल्या वादातून एका 18 वर्षीय तरुणाची त्याच्या चार मित्रांनी हत्या केली. मारेकऱ्यांपैकी दोघे अल्पवयीन आहेत. पोलिसांनी अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आणि उर्वरित आरोपींना अटक केली. मुंबई पोलिसांनी सांगितले की, उत्तर प्रदेशातील 19 आणि 22 वयोगटातील दोन आरोपींना गुजरातमधून अटक करण्यात आली, तर अल्पवयीन मुलांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आणि नंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले.

    जुना वाद उकरुन काढत खून

    शिवाजी नगर पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीने ३१ मे रोजी एका ढाब्यावर वाढदिवसाची पार्टी दिली होती. वाढदिवसाच्या पार्टीसाठी जेवणाचे बिल सुमारे 10,000 रुपये आले. बिल देण्यावरून मृत आणि त्याच्या मित्रांमध्ये वाद झाला, मात्र त्याने खिशातून पैसे देऊन प्रकरण मिटवले. नंतर चार आरोपींनी आणखी एका वाढदिवसाची पार्टी आयोजित केली आणि त्यांच्या मित्राला कार्यक्रमासाठी आमंत्रित केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केक खाल्ल्यानंतर चार मित्रांनी त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. ही घटना उघडकीस आल्यानंतर १७ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले, तर उर्वरित आरोपींना अहमदाबाद येथून अटक करण्यात आली, ते उत्तर प्रदेशात पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. अल्पवयीन मुलांना सुधारगृहात पाठवण्यात आले, तर इतर दोन आरोपींना भारतीय दंड संहितेच्या (IPC) 302 (हत्या) सह संबंधित कलमांखाली अटक करण्यात आली, असे अधिकाऱ्याने सांगितले.