Fraud

ऑडी कारवर २० लाख रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे घेऊन एक लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार १ एप्रिल ते १५ मे २०२२ दरम्यान कावेरी नगर, वाकड येथे घडला.

    पिंपरी: ऑडी कारवर २० लाख रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे घेऊन एक लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार १ एप्रिल ते १५ मे २०२२ दरम्यान कावेरी नगर, वाकड येथे घडला.
    हनुमंत सुरेश चव्हाण (वय ३५, रा. कावेरी नगर पोलीस वसाहत, वाकड) यांनी सोमवारी (दि. ९) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, लक्ष्मी फायनान्सचे रिकव्हरी मॅनेजर तुकाराम शिंदे, मॅनेजर राजू शर्मा, मॅनेजर जयेश पांडे आणि जामीनदाराची पत्नी भाग्यश्री धोत्रे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना पैशांची गरज होती. दरम्यान, त्यांचा मित्र शाम मोटवानी याने आरोपी तुकाराम शिंदे याच्याशी फिर्यादी यांची भेट करून दिली. त्यानंतर आरोपींनी आपसात संगणमत करून फिर्यादी यांना कार तारण ठेऊन २० लाख रुपयांचे कर्ज (Audi Car Loan) देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी डिपॉझिट, करारनामा व जामीनदार अशी वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून एक लाख ६५ हजार रुपये घेतले. त्यानंतर कर्ज न देता आरोपींनी फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.