share market fall

शेअर बाजारात गुंतवणूक करण्याबाबत टिप्स घेणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. गुंतवणुकीच्या टिप्स देऊन पैसे घेऊन तसेच चुकीच्या पद्धतीने पैसे गुंतवण्यास सांगून सुमारे 11 लाख 13 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार वाकड येथे उघडकीस आला आहे. हा प्रकार जानेवारी ते 14 मे 2022 या कालावधीत घडला(Fraud of Rs 11 lakh by giving wrong tips about investing in the stock market).

    पिंपरी : शेअर बाजारात गुंतवणूक करण्याबाबत टिप्स घेणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. गुंतवणुकीच्या टिप्स देऊन पैसे घेऊन तसेच चुकीच्या पद्धतीने पैसे गुंतवण्यास सांगून सुमारे 11 लाख 13 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार वाकड येथे उघडकीस आला आहे. हा प्रकार जानेवारी ते 14 मे 2022 या कालावधीत घडला(Fraud of Rs 11 lakh by giving wrong tips about investing in the stock market).

    निखिल नवीन खंडेलवाल (वय 37, रा. वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अभिमन्यू (मोबाईल क्रमांक 8109846678), मोबाईल क्रमांक 9755842383 धारक, आयसीआयसीआय बँक खाते क्रमांक 291201001747 धारक, आयसीआयसीआय बँक खाते क्रमांक 291201001744 धारक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना फोन करून शेअर बाजारात गुंतवणुकीच्या टिप्स देतो असे सांगितले. एक दिवस डेमो टिप्स दिल्या. त्यातून फिर्यादीचा विश्वास संपादन करून आरोपींनी दिशाभूल करून रजिस्ट्रेशन आणि सेवाशुल्क म्हणून फिर्यादीकडून एक लाख 61 हजार 111 रुपये बँक खात्यावर घेतले. त्यानंतर फिर्यादी यांना फोन करून शेअर बाजारात चुकीच्या पद्धतीने पैसे गुंतवण्यासाठी सल्ला देत त्यांचे सुमारे 11 लाख 13 हजार रुपयांचे नुकसान केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.