मुलीला बसमधून खेचून नराधमांनी केला सामूहिक अत्याचार, आठ जणांवर गुन्हा दाखल

काटघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही तरुणांनी मुलीला बसमधून बाहेर काढले. यानंतर तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

  देशभरात गुह्यांमध्ये (Crime) वाढ होताना दिसत आहे. त्यातही महिला अत्याचारासंदर्भातली गुन्ह्याचं प्रमाणही वाढल्याचं दिसत आहे. उत्तर प्रदेशमधून एका तरुणीवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुरादाबाद येथे एका तरुणीला बसमधून ओढून तिच्यावर सामूहिक अत्याचार (Abuse) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

  नेमका प्रकार काय?

  गावातील एका व्यक्तीने आरोप केला की त्याच्या गावातील वरुण, माँटी, नकुल, अमरजीत, अमित, सुनील आणि शेर सिंह या सगळ्यांनी मिळून त्याच्या विनयभंग केला. २१ एप्रिल रोजी तिची मुलगी मावशीसोबत बसने काशीपूरला जात होती. आपल्या मुलीला बसमध्ये पाहून आरोपीही बसमध्ये बसले. भोजूपर पोलीस स्टेशन हद्दीतील चकबेगमपूर-हमीरपूर या गावादरम्यान बस पोहोचली असता आरोपीने बस थांबवली आणि आरोपीने तिच्या मुलीला बसमधून ओढले.

  मुलीवर सामूहिक अत्याचार

  त्यानंतर आरोपींनी आपल्या मुलीला बसमधून ओढून नेले. त्या व्यक्तीने सांगितले की, तिने आरडाओरडा केला तेव्हा आरोपींनी त्याच्या मुलीला मादक पदार्थ असलेल्या रुमालाचा  तिच्या नाकाला लावून तिला बेशुद्ध केलं. त्यानंत वरुण, अमरजीत, अमित आणि सुनील यांनी तिच्या मुलीवर सामूहिक केला. त्यानंतर आरोपी मुलीला सोडून गेले.

  त्या व्यक्तीने सांगितले की, तिच्या मुलीने शुद्धीवर आल्यानंतर रस्त्याने जाणाऱ्यांना याची माहिती दिली. त्यावर एका व्यक्तीने 112 पोलिसांना फोन करून माहिती दिली. त्या व्यक्तीचा आरोप आहे की, रामपूर दौरे चौकीवर गेल्यानंतर त्यांनी भोजपूर पोलिस ठाण्यात तक्रार केली, परंतु पोलिसांनी तक्रार नोंदवली नाही. आता न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी आठ आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला आहे.