Gang rape on woman just before International Women's Day! The victim was with the married woman and her husband.

पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, शनिवारी सायंकाळी ही तरुणी आपल्या होणाऱ्या नवऱ्याला भेटण्यासाठी आली होती. दरम्यान, काही तरुण त्यांच्याजवळ आले आणि त्यांनी मुलीच्या होणाऱ्या नवऱ्याला पिटाळून लावले आणि तिच्यावर सामूहिक बलात्काराची घटना केला.

    झारखंड:  झारखंडमधील लोहरदगा जिल्ह्यात सामूहिक बलात्काराची (Jharkhand Gang Rape) धक्कादायक घटना समोर आली आहे. होणाऱ्या नवऱ्याला भेटायला गेलेल्या मुलीवर सहा नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. झारखंडमधील लोहरदगा जिल्ह्यातील कुडू पोलीस स्टेशन परिसरात मुलीसोबत अत्याचाराची ही घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास करीत आहे. 

    पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, शनिवारी सायंकाळी ही तरुणी आपल्या होणाऱ्या नवऱ्याला भेटण्यासाठी आली होती. दरम्यान, यावेळी काही तरुण त्यांच्याजवळ आले आणि त्यांनी मुलीची छेड काढत तिच्या सोबत असेलेल्या मुलाला मारहाण करत तिथून पिटाळून लावले आणि त्या सर्वा नराधमांनी मुलीवर सामूहिक बलात्कार केला. दरम्यान त्या मुलीने कशीबशी स्वतची सुटका केली आणि घरी पोहचून कुटुंबियांना सगळं सांगितलं. यानंतर कुटुंबीयांनी अज्ञाताविरुद्ध एफआयआर दाखल केला.

    लोहरदगा सदर रुग्णालयात मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून या घटनेनंतर सर्व आरोपी फरार आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी अनेक पथके तयार केली असून कारवाई सुरू आहे. आरोपींची ओळख पटवून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल. अशी माहिती पोलिसांनी दिली.