गर्भवती पत्नी झाली बेपत्ता, पोलिसांनाही नाही सापडली, पतीने पोलीस उपायुक्त कार्यालयातच केलं असं की…

Ghaziabad News: उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने जिल्ह्याच्या पोलीस उपायुक्त कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पीडित व्यक्तीची गरोदर पत्नी १६ जुलै रोजी अचानक बेपत्ता झाल्याचे सांगण्यात आले, परंतु पोलीस हे प्रकरण गांभीर्याने घेत नाहीत. त्याचबरोबर कौटुंबिक वाद असल्याने या प्रकरणाची चौकशी करावी, असे पोलिसांनी म्हटले आहे.

    गाझियाबाद : दिल्लीला लागून असलेल्या उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये (Uttar Pradesh, Gaziabad) पत्नी बेपत्ता (Wife Missing) झाल्याने दु:खी झालेल्या पतीने (Husband) विष प्राशन (Ingestion Of Poison) करून आत्महत्येचा (Suicide) प्रयत्न केला. पीडित व्यक्तीची गर्भवती पत्नी १६ जुलैपासून बेपत्ता आहे. पतीने पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रारही (Complaint) दाखल केली होती, मात्र पोलिसांना अद्याप महिलेचा शोध घेता आलेला नाही.

    हे संपूर्ण प्रकरण गाझियाबादचे आहे, येथील सुमित नावाच्या व्यक्तीची पत्नी १६ जुलैपासून बेपत्ता आहे. बेपत्ता झालेल्या पीडित व्यक्तीची पत्नीही गर्भवती आहे. पीडित व्यक्तीने पोलिसांत तक्रारही केली होती. मात्र अद्याप यश न आल्याने तक्रारदाराने रविवारी सकाळी अकरा वाजता पोलीस उपायुक्त कार्यालय गाठले आणि खिशातून कुपी काढून विषारी द्रव्य प्राशन केले. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, आता त्याची प्रकृती स्थिर आहे.

    वास्तविक, तक्रारदार सुमित (Sumit) हा गाझियाबादमधील निवारी येथील रहिवासी आहे. याचवर्षी मार्चमध्ये आपले लग्न झाल्याचे त्याने फिर्यादीत म्हटले आहे. यानंतर त्याची पत्नी जूनमध्ये गरोदर राहिली. दरम्यान, १६ जुलै रोजी वाद झाल्यानंतर पत्नी अचानक घर सोडून कुठेतरी निघून गेली. आजतागायत तिचा शोध लागला नाही. पोलीस तिची तक्रार गांभीर्याने घेत नसल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे.

    दुसरीकडे, पोलिसांचे म्हणणे आहे की, फिर्यादीच्या पत्नीनेही पती मारहाण करत असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती. हा कौटुंबिक वादाचा मुद्दा असून कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.