Marriage of same-sex couples invalid

मंगळवारी पहाटेच्या सुमारास ब्रम्हपुरी येथील दिवाणी न्यायालयाच्या निर्माणाधिन इमारतीच्या गेटवर पौर्णिमाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. त्यानंतर ही घटना उघडकीस आली.

    चंद्रपूर : सध्या लग्नाचा सिझन सुरू आहे. रोज काही ना काही हटके लग्नाच्या बातम्या कानी पडतात. मात्र,चंद्रुपुरातून एक विचित्र घटना समोर आली आहे. होणाऱ्या नवऱ्याने लग्नास नकार दिल्याने एका तरुणीने त्याच्याच कार्यालयासमोर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालीआहे. पौर्णिमा मिलिंद लाडे या (वय27) असं या मुलीच नाव आहे.

    गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यात असलेल्या कोरेगाव (चोप) येथील रहिवासी असलेल्या पौर्णिमाचं लग्न ब्रम्हपुरीत राहणाऱ्या सचिन शेंडे या तरुणासोबत ठरलं होतं. दीड वर्ष आधीच त्यांचा साखरपुडा झालाही होता. सचिन हा ब्रम्हपुरी च्या दिवाणी न्यायालयात चपराशी पदावर कार्यरत आहे. मात्र काही दिवसापासून तो  लग्नास टाळाटाळ करत होता. त्यामुळे दुखावलेल्या तरुणीने तो काम करत असलेल्या ठिकाणी गळफास घेत आत्महत्या केली.

    मंगळवारी पहाटेच्या सुमारास  ब्रम्हपुरी येथील दिवाणी न्यायालयाच्या निर्माणाधिन इमारतीच्या गेटवर पौर्णिमाचा  मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांना (Police) दिल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणी तिच्या वडिलांच्या तक्रारी वरून सचिन शेंडे वर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.