
घटनास्थळी त्याच्या ओठाचा तुकडाही तिथेच पडला होता. पोलिसांनी ते एका पाकिटात बंद करून आरोपीला जवळच्या रुग्णालयात पाठवले जेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये (meerut) एका तरुणावर अत्याचार करु पाहणाऱ्या नराधमाला एक तरुणीने आयुष्यभराची अद्दल घडवली आहे. मुलीची छेड काढुन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे या धाडसी मुलीनं ओठ चावून वेगळचं केलं. रक्तबंबाळ झालेल्या तरुणावर सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोहित सैनी असे आरोपीचे नाव आहे. यासोबतच पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
मेरठ जिल्ह्यातील दौराला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अझोंटा जंगलात शनिवारी दुपारी एक मुलगी शेतात काम करत होती. त्या मुलीला एकटे पाहून तेथून जाणाऱ्या तरुणाने अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली आणि एवढेच नाही तर तरूणाने बळजबरीने मुलीचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी मात्र त्या धाडसी तरुणीने हिंमत दाखवत तिचा एक ओठ कापला. तरुणाचा ओठ कापल्यामुळे रक्तस्त्राव झाला आणि तो वेदनेने विव्हळू लागला. आणि संधी साधत तरुणीने पळ काढला अशाप्रकारे तिने स्वत:ला त्याच्या तावडीतुन सोडवलं.
आरोपी पोलिसांच्या ताब्यात
अशा स्थितीत मुलीनेही घटनास्थळी आरडाओरडा केल्याने आजूबाजूचे लोक तेथे आले. लोकांनी आरोपी तरुणाला पकडून पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला ताब्यात घेतले. घटनास्थळी त्याच्या ओठाचा तुकडाही तिथेच पडला होता. पोलिसांनी ते एका पाकिटात बंद करून आरोपीला जवळच्या रुग्णालयात पाठवले जेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.