boyfreind burnt alive

पहिला प्रियकर आपले लग्न माेडत असल्याच्या संशयावरून मुलगी आणि तिच्या घरच्यांनी गोरख बच्छाव या युवकाला जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार लाेहाेणर (Lohonor) येथे घडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी देवळा पोलिसांकडे (Deola Police) तक्रार दाखल करण्यात आली असून, संबंधित मुलीसह पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

    नाशिक : सध्या व्हॅलेंटाइन वीक सुरु आहे. हा खरंतर प्रेम व्यक्त करण्याचा काळ. मात्र याच काळात प्रेययीने आपल्या प्रियकराला जाळल्याची (Girlfriend Burnt Boyfriend) घटना घडली. पहिल्यांदाच असा विचित्र प्रकार घडला आहे.पहिला प्रियकर आपले लग्न माेडत असल्याच्या संशयावरून मुलगी आणि तिच्या घरच्यांनी गोरख बच्छाव या युवकाला जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार लाेहाेणर (Lohonor) येथे घडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी देवळा पोलिसांकडे (Deola Police) तक्रार दाखल करण्यात आली असून, संबंधित मुलीसह पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

    या हल्ल्यात पीडित युवक ५५ टक्के भाजला असून त्याच्यावर देवळा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. देवळा पोलिसांनी संबंधित मुलगी, तिचे आई वडिल आणि दोन भाऊ यांना ताब्यात घेतले आहे. यापैकी एक आरोपी अल्पवयीन आहे.

    पीडित मुलाचे आणि आरोपी मुलीचे प्रेमसंबंध होते. मात्र काही कारणाने दोघांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर मुलीचे दुसरीकडे लग्न ठरले होते. मात्र ते मोडले. याच रागातून पीडित तरुणावर हल्ला करण्यात आला.

    तरुणावर संशय
    मालेगाव तालुक्यातील रावळगाव येथील रहिवासी असलेल्या मुलीचे देवळा तालुक्यात लोहणेर येथील गोरख बच्छाव सोबत सात वर्षापासून प्रेमसंबंध होते. दोघेही नातेसंबंधातील असल्याचे बोलले जाते. मात्र दोन महिन्यांपूर्वीच त्यांचे ब्रेक अप झाले होते. ब्रेकअप का झाले ते कळू शकले नाही. दोघांच्या ब्रेकअपनंतर मुलीचे दुसरीकडे लग्न ठरले होते. मात्र काही कारणाने हे लग्न मोडले. त्यामुळे गोरखनेच मुलीच्या सासरच्यांना सांगून लग्न मोडले, असा मुलीला आणि तिच्या घरच्यांना संशय होता. याच संशयातून त्यांनी गोरखला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या आई, वडील व दोन भाऊ यांनी संगनमताने मुलाच्या डोक्यात वार करुन मुलीने अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. यात तरुण ५५ टक्के भाजल्याची वैद्यकीय सूत्रांकडून माहिती मिळते. देवळा पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत युवकाला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.