प्रेमात धोका मिळालेल्या प्रेयसीनं केलं कांड, प्रियकराच्या लग्नाच्या वरातीत जाऊन त्याच्यावर केला ॲसिड हल्ला!

आपल्याला सोडून दुसऱ्या मुलीसोबत लग्न करण्यास निघालेल्या प्रियकरावर प्रेयसिने ॲसिड हल्ला केल्याची घटना घडली आहे.

  प्रेमसंबधातून (love affair) गुन्हे घडण्याचं प्रमाण हल्ली वाढलयं. अनेक कपल प्रेमात पडल्यावर आयुष्यभर साथ देण्याची वचनं देतात आणि काही कारणामुळे दोघापैकी कुणीही त्या नात्याला शेवटपर्यंत नेऊ शकलं नाही किंवा प्रेमात विश्वासघात झाल्यास तरुण तरुणी अगदी टोकाला जातात. मग प्रियकराने किंवा प्रेयसीने लग्नाला नकार दिल्यास आत्महत्या करणे, हत्या करणे यासारखे गुन्हे घडतात. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशमधील बलिया जिल्ह्यात घडला आहे. दुसऱ्या मुलीसोबत लग्न करण्यास निघालेल्या प्रियकरावर प्रेयसीने ॲसिड हल्ला केल्याची घटना (Girlfriend Acid Attack On Boyfriend) घडली आहे.

  नेमका प्रकार काय?

  बलिया जिल्ह्यातील बांसडीह रोड येथील डुमरी गावात ही घटना घडली. गावातील एका तरुण तरुणीमध्ये गेल्या दोन वर्षापासून प्रेमसंबध होते. त्यांनी एकत्र राहण्याच्या आणभाका घेतल्या. मात्र काही कारणामुळे त्यांचं लग्न होऊ शकलं नाही. अशातच तरुणाचं दुसऱ्या तरुणीसोबत लग्न जुळलं. ही बाब प्रेयसीला माहित होताच तिने त्याला समजवायचा प्रयत्न केला मात्र तरीही तो एकत नसल्यामुळे तिने संतापाच्या भरात अंगावर ॲसिड फेकलं. या घटनेनंतर गावात एकच गोंधळ उडाला.

  भर रस्त्यावर  फेकलं अॅसिड

  प्रियकारचं दुसऱ्या मुलीसोबत मंगळवारी सायंकाळी लग्न होतं. ही बाब प्रेयसीला माहित होती. त्याच्यासोबत लग्न होत नसल्यामुळे ती प्रचंड संतापली होती. ती श्रृंगार करुन प्रियकराच्या वरातीत सामिल झाली. तीने आपल्यासोबत पॉलिथीनमध्ये टॉयलेट साफ करण्याचं ॲसिड आणलं होतं. ज्यावेळी तो कुटुंब आणि मित्रपरिवारासोबत डान्स करण्यात व्यस्त होता, त्यावेळी प्रेयसीने वराच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकलं.

  प्रेयसीवर गुन्हा दाखल

  या घटनेनंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली. गावातील लोकांनी वराला गंभीर अवस्थेत एका खासगी अवस्थेत रुग्णालयात दाखल केलं.  दोन तास त्याच्यावर उपचार करण्यात आल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आलां. त्यानंतर डॉक्टरांची परवानगी घेतल्यानंतर रात्री साडेदहा वाजता वरमुलाची वरात मऊ येथील बेल्थरा रस्त्यासाठी रवाना झाली. या प्रकरणी वराची आई मुन्नी देवीच्या तक्रारीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कार्यवाही केली जात आहे, असं पोलिसांनी सांगितलं.