बॉयफ्रेंड इतर इतर मुलींकडे बघायचा, संतापलेल्या गर्लफ्रेंडने त्याच्या डोळ्यात खुपसलं रेबीजचं इंजेक्शन

अमेरिकेतील मियामीमध्ये एका महिलेने तिच्या प्रियकरासोबत भांडण झाल्यानं रागाच्या भरात प्रियकराच्या डोळ्यात रेबीजचे इंजेक्शन टोचलं. प्रियकाराच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिला अटक केली आहे.

    आजकाल क्षुल्लक कारणावरुन प्रियकर प्रेयसीमध्ये भांडण होऊन नात्यात वितुष्ट येतंं. अनेकदा हे भांडण वाढत जाऊन त्याच पर्यवसन मारहाणीत होतं. कधी यातुन गंभीर गुन्हाही घडतो. असाच काहीसा प्रकार अमेरिकेत घडला आहे. बॅायफ्रेंड दुसऱ्या तरुणीकडे पाहतो म्हणून तरुणीने रागाच्या भरात त्याच्या डोळ्यात रेबीजचं इंजेक्शन खुपसलं. या घटनेनतंर  बॅायफ्रेंडच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिला अटक केली आहे.

    नेमका प्रकार काय

    मियामी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४४ वर्षीय महिला सँड्रा जिमेनेझचे पीडित युवकासोबत आठ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्या युवकाने आपल्या कुत्र्यासाठी रेबीजचे दोन इंजेक्शन आणले होते. पीडित तरुण इतर महिलांना पाहत असल्याच्या कारणावरून दोघांमध्ये बराच वेळ वाद सुरू होता. रात्री 10 वाजता दोघांमध्ये हाणामारी झाली. यावेळी राग अनावर झाल्याने महिलेने त्याच्यावर उडी मारली. तिच्या दोन्ही हातात रेबीजचे इंजेक्शन होते. युवकाने ते पाहिले मात्र, त्याला काही कळायच्या आत महिलेने त्याच्या उजव्या डोळ्यात ते इंजेक्शन टोचलं. त्यानंतर महिलेने घटनास्थळावरून पळ काढला.

    दरम्यान पीडित तरुणाने 911 वर कॉल करून पोलिसांना घटनेची माहिती दिली. काही तासांनंतर पोलिसांना ही महिला घराबाहेर एका कारमध्ये झोपलेली आढळली. पोलिसांनी तात्काळ जिमेनेझला अटक केली. मात्र,  जिमेनेझ तिच्यावर लावलेले सगळे आरोप फेटाळत ती दोषी नसल्याची कबुली दिली आहे. या भांडणात आपल्यालाही दुखापत झाल्याचा दावा तिने केला आहे. तर दुसरीकडे पीडित तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.