गुड्डू मुस्लिम पोलिसांच्या हातावर आजही तुरी देऊन होतोय पसार, शोध अद्यापही सुरूच

उमेश पाल खून प्रकरण आणि प्रयागराजमध्ये अतिक-अश्रफ यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर गुड्डू मुस्लिमाचा शोध युपी एसटीएफ कडून अद्यापही सुरूच आहे.

    अतिक अहमद (Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ (Brother Asraf) यांची हत्या (Murder) आणि असदसोबत झालेल्या चकमकीनंतर (Encounter) उत्तर प्रदेश पोलिसांचे स्पेशल टास्क फोर्स (Special Task Force Up Police) हल्लेखोर गुड्डू मुस्लिम (Guddu Muslim) याचा शोध घेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुड्डू मुस्लिम सतत आपले लपण्याचे ठिकाण बदलत असून एसटीएफच्या पथकाने त्याला चार वेळा पकडले आहे. दरम्यान, त्याचे नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

    हल्लेखोर गुड्डू मुस्लिमचे नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, त्यात तो कुठेतरी जाताना दिसत आहे. गुड्डू मुस्लिम हा पोलिसांच्या कव्हरेजबाहेर असून त्याचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा फोटो ओडिशाचा आहे. गुड्डू मुस्लिम 11 एप्रिल रोजी बारगढ, ओडिशात दिसला, जेव्हा STF तिथे पोहोचली… गुड्डू मुस्लिम फरार होता. गुड्डू मुस्लिम आजवर चार वेळा एसटीएफच्या हातावर तुरी देऊन निसटला आहे. गुड्डू मुस्लिमला बीपी, शुगर या आजारांनी घेरले आहे. जीव वाचवण्यासाठी तो सतत एसटीएफ टीमपासून पळ काढण्यात यशस्वी होत आहे.

    गुड्डू मुस्लिम 24 फेब्रुवारी रोजी उमेशपाल आणि त्याच्या दोन सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या हत्येनंतर फरार आहे. गुड्डू मुस्लिम प्रयागराज ते झाशी, नंतर झाशी ते अजमेर, अजमेर ते दिल्ली मेरठ आणि दिल्ली ते बिहार भागलपूर पर्यंत पळून गेला आणि नंतर पश्चिम बंगालमार्गे त्याने ओडिशा गाठले आहे. हत्येनंतर गुड्डू मुस्लिमने साबरमती कारागृहातील कैदी अतिक अहमद याच्याशी फोनवर संवाद साधला. युपी एसटीएफने आधीच हत्येतील आरोपींपैकी अतिकची मुले असद, गुलाम आणि अरबाज यांचा एन्काऊंटरमध्ये खात्मा केला आहे.