
एसडीपीओ विकास आनंद यांनी सांगितले की, कामदरा पोलिस स्टेशन हद्दीतील कोंडेकेरा गावाबाहेर रस्त्यावर मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली आहे. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. मृतदेहाची ओळख पटू शकली नाही.
गुमला : जिल्ह्यातील (Gumla District) गुन्हेगारांचे मनोधैर्य खचण्याचे नाव घेत नाही. दररोज दरोडा, खुनासह अन्य गुन्हेगारी घटना घडत आहेत. मात्र, पोलिसांना चोरट्यांच्या कारवायांना जरब बसविता आलेली नाही. ताज्या प्रकरणात, कामदरा पोलिस स्टेशन (Kamdara Police Station) हद्दीतील कोंडेकेरा गावात (Kondekera Village) अज्ञात गुन्हेगारांनी एका ५० वर्षीय व्यक्तीची हत्या केली (A 50 year old man was killed by unknown criminals). हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करून ही हत्या केली आहे.
गावात महिला लाकडे गोळा करण्यासाठी जंगलाकडे जात होत्या. त्याचवेळी त्यांना रस्त्यात मृतदेह (Dead Body) पडलेला दिसला. मृतदेह पाहून महिलांना धक्काच बसला. शरीराचा वरचा भाग रक्ताने माखलेला होता. या प्रकरणाची माहिती गावात पोहोचताच घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दी झाली. मृताची अद्याप ओळख पटलेली नाही. दरम्यान, कोणीतरी पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर एसडीपीओ विकास आनंद फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. तेथे उपस्थित लोकांना विचारपूस केली.
पोलीस तपास करत आहेत
एसडीपीओ विकास आनंद यांनी सांगितले की, कामदरा पोलिस स्टेशन हद्दीतील कोंडेकेरा गावाबाहेर रस्त्यावर मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली आहे. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. मृतदेहाची ओळख पटू शकली नाही. मृतदेह पाहिल्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याचे दिसते. ग्रामस्थांची विचारपूस केली आहे. पोलीस या प्रकरणाचा विविध अंगांनी तपास करत आहेत.