gurugram crime news bhondsi jail clash between two prisoners with spoon tihar jail tillu tajpuria murder nrvb

तिहार तुरुंगानंतर आता गुरुग्रामच्या भोंडसी तुरुंगात कैद्यावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. येथे एका कैद्याने दुसऱ्यावर चमच्याने हल्ला केला. मला मारण्याचा प्रयत्न केल्याचे पीडित कैद्याने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

  दिल्लीतील (Delhi) तिहार तुरुंगात (Tihar Jail) गुंड टिल्लू ताजपुरियाच्या (Gangster Tillu Tajpuria) हत्येनंतर (Murder) हरियाणातील (Haryana) सर्व तुरुंगांना अलर्टवर (Alert) ठेवण्यात आले आहे. दरम्यान, गुरुग्रामच्या भोंडसी कारागृहात एका कैद्याने आपल्या सहकारी कैद्यावर चमच्याने हल्ला करून जखमी केले (Gurugram Bhondsi Jail a prisoner attacked and injured his co prisoners with spoons).

  पोलिसांनी शनिवारी सांगितले की, रेवाडी तुरुंगातील जातुसना गावातील रहिवासी अंडरट्रायल कैदी मंगत राम यांच्या तक्रारीनुसार, शुक्रवारी सकाळी तुरुंगात हा हल्ला झाला.

  मंगत राम यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, “शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास रेवाडी येथील कैदी मोनू उर्फ बुधा याने माझ्यावर सुमारे सहा इंच लांबीच्या चमच्याने हल्ला केला. तो मला मारण्याचा प्रयत्न करत होता.”

  पीडित कैद्याच्या तक्रारीच्या आधारे, शनिवारी भोंडसी पोलिस ठाण्यात मोनूविरुद्ध आयपीसी कलम 323 (दुखापत करणे) आणि 506 (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला. दुसरीकडे एका पोलीस अधिकाऱ्याने या प्रकरणाबाबत सांगितले की, तपास सुरू असून आरोपी कैद्याला लवकरच प्रॉडक्शन वॉरंटवर चौकशीसाठी नेले जाईल.

  हरियाणातील सर्व तुरुंगांना दिलाय अलर्ट

  गुंड टिल्लू ताजपुरियाची तिहार तुरुंगात हत्या करण्यात आली होती, त्यानंतर हरियाणातील सर्व तुरुंग हाय अलर्टवर आहेत. त्याचबरोबर या घटनेनंतर जेल प्रशासनाने जेवणादरम्यान चमचा न देण्याचे आदेशही जारी केले आहेत.

  2 मे रोजी टिल्लूची हत्या झाली होती

  2 मे रोजी दिल्लीतील तिहार तुरुंगात गँगस्टर टिल्लू ताजपुरियाची हत्या करण्यात आली होती. तुरुंगात असलेल्या गोगी टोळीच्या चार कार्यकर्त्यांनी ही घटना घडवली. ताजपुरिया यांच्यावर धारदार शस्त्रांनी 92 वेळा हल्ला करण्यात आला. टिल्लू ताजपुरिया हा 2021 च्या रोहिणी कोर्ट गोळीबारात आरोपी होता. या हल्ल्यात गँगस्टर जितेंद्र गोगी ठार झाला. गोगी टोळीने आपल्या नेत्याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी टिल्लू ताजपुरियाची निर्घृण हत्या केल्याचे सांगितले जात आहे.

  ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे

  हल्लेखोर दीपक उर्फ ​​तीतर, योगेश उर्फ ​​टुंडा, राजेश आणि रियाझ खान हे ताजपुरिया बंद असलेल्या पहिल्या मजल्यावरून तळमजल्यावर मंगळवारी सकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास चादरीच्या सहाय्याने गेले आणि त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेचे दोन सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहेत. टिल्लूच्या मृत्यूनंतरही हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचे यात दिसून आले, त्यावेळी 7-8 पोलीस कर्मचारी बघ्याच्या भूमिकेत उभे होते.