ज्ञानवापी आमची आहे…५६ तुकडे करु; भाजप महिला नेत्यांना धमकी

ज्ञानवापी आमची आहे आणि आमचीच राहणार, असेही या पत्रात म्हटले आहे. आमच्या धर्माबद्दल पोस्ट लिहिली तर उदयपूरमध्ये कन्हैयालालची जी अवस्था झाली, तीच अवस्था तुमची होईल, असे सांगत गुस्ताख-ए-रसूलच्या शिक्षेनुसार तुमचे ५६ तुकडे करु, अशी धमकीही दिल्याचे चारुल यांनी सांगितले.

    जयपूर : राजस्थानमधील (Rajasthan) अलवर येथील भाजप नेत्या चारुल अग्रवाल (BJP leader Charul Agarwal) यांना ज्ञानवापी मशिदीबाबत (Gyanvapi Masjid) सोशल मीडियावर (Social Media) भाष्य त्रासदायक ठरत आहे. चारुल यांना त्यांच्या सोसायटीच्या लिफ्टजवळ धमकीचे पत्र (Letter Of Threat) सापडले. यामध्ये धमकी देणाऱ्या व्यक्तीने शिरच्छेद करून ५६ तुकडे करण्याची धमकी दिली असून याबाबत चारुल यांनी पोलिसांना माहिती दिली आहे.

    चारुल यांनी सांगितले की, मी संभल (यूपी) येथून बीएससी आणि मुरादाबादमधून एमएसी केले आहे. त्यानंतर आयआयटी दिल्लीतून एम.टेक. केले. सध्या मी अलवर येथे टॉवर क्रमांक ३ मध्ये राहते. सोमवारी सकाळी ७.४५ वाजता मुलांना शाळेत सोडण्यासाठी मी फ्लॅटच्या बाहेर आली असता, खिडकीजवळ एक पत्र दिसले. त्यात जीवे मारण्याची धमकी देत २५ सप्टेंबर ही तुमची शेवटची तारीख असेल, अशी धमकी दिली आहे.

    ज्ञानवापी आमची आहे आणि आमचीच राहणार, असेही या पत्रात म्हटले आहे. आमच्या धर्माबद्दल पोस्ट लिहिली तर उदयपूरमध्ये कन्हैयालालची जी अवस्था झाली, तीच अवस्था तुमची होईल, असे सांगत गुस्ताख-ए-रसूलच्या शिक्षेनुसार तुमचे ५६ तुकडे करु, अशी धमकीही दिल्याचे चारुल यांनी सांगितले. १३ सप्टेंबर रोजी चारुल यांनी फेसबुकवर ज्ञानवापीबद्दल एक पोस्ट टाकली होती. त्यानंतर १९ सप्टेंबरपासून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या आहेत.