Died while dancing at a friend's wedding procession; A heart-wrenching incident in Beed

जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागातील संग्रामपूर तालुक्यातील हाडियामहाल या गावात एका २० वर्षीय तरुणाला लग्नात नाचताना धक्का लागला. या कारणावरून काही जणांना मारहाण झाली. यामध्‍ये तरुणाचा मृत्‍यू झाल्‍याची घटना घडली. यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे(He died as he was hit while dancing).

    बुलढाणा : जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागातील संग्रामपूर तालुक्यातील हाडियामहाल या गावात एका २० वर्षीय तरुणाला लग्नात नाचताना धक्का लागला. या कारणावरून काही जणांना मारहाण झाली. यामध्‍ये तरुणाचा मृत्‍यू झाल्‍याची घटना घडली. यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे(He died as he was hit while dancing).

    हाडियामहाल गावात १७ मेस विवाह सोहळा होता. या विवाह सोहळ्याच्‍या वरातीत सर्वजण नाचण्यात दंग होते. परंतु नाचताना एकमेकांना धक्‍का लागला. यात वरातीतच वाद झाला. यानंतर वादाचे रूपांतर मारहाणीत होवून गावातीलच चार ते पाच जणांना मारहाण झाली होती.

    यात रवी वारकेला हा युवक गंभीर जखमी झाला होता. त्याला अकोला येथील सर्वोपचार केंद्रात उपचार सुरू होते. दरम्यान आज सकाळी त्याचा मृत्यू झाला. तर अन्‍य तीन जणांवर उपचार सुरू आहेत.

    सदर घटनेने गावात तणाव निर्माण झाला असून हाडियामहाल या आदिवासी गावात सोनाळा पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला आहे. गावात तणावपूर्ण शांतता असून सोनाळा पोलीसात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.