दिल्लीतून १३० कोटींचे हेरोईन जप्त; आंतरराष्ट्रीत तस्करांचा पर्दाफाश

दिल्ली पोलिसांच्या पथकाने ड्रग तस्करांवर कारवाई करत सुमारे २१.४०० किलो हेरोईन जप्त केले आहे. आंतररष्ट्रीय बाजारात या जप्त केलेल्या हिरोईनची किंमत सुमारे १३० कोटी रुपये आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणात चार आरोपींना अटक केली असून अधिक तपास सुरु आहे.

    नवी दिल्ली : पोलिसांच्या क्राईम ब्रांच पथकाने (Crime Branch) अमली पदार्थांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश (Narcotic Racket Busted) केला आहे. दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रांच पथकाने शुक्रवारी मोठी अमली पदार्थविरोधी कारवाई केली. अफगाणिस्तान (Afghanistan) येथून भारतातील पंजाब, दिल्ली यांसारख्या इतर राज्यांमध्ये हेरोईन तस्करी सुरु होती. पोलिसांनी या आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेटचा पर्दाफाश करत एका अफगाणी नागरिकासह (Afghan Citizen Arrest) चार जणांना अटक केली आहे.

    दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) पथकाने ड्रग तस्करांवर कारवाई करत सुमारे २१.४०० किलो हेरोईन (Heroin) जप्त केले आहे. आंतररष्ट्रीय बाजारात या जप्त केलेल्या हिरोईनची किंमत सुमारे १३० कोटी रुपये आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणात चार आरोपींना अटक केली असून अधिक तपास सुरु आहे. दरम्यान, या रॅकेटमध्ये सुमारे २५० तस्करांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली आहे.

    दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचे उपायुक्त केपीएस मल्होत्रा यांनी सांगितले की, मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नसीम बरकाजीला कर्करडूमा येथून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून तीन किलो हेरॉईन जप्त करण्यात आले. चौकशीदरम्यान नसीमकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ईशान्य दिल्लीतील भजनपुरा भागात छापा टाकून ७.४ किलो हेरॉईन जप्त केले. तसेच, महावीरनगर आणि डाबरी परिसरात छापा टाकून आणखी एकाला अटक करत ११ किलो हेरॉईन जप्त केले.