गोव्यात हायप्रोपाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! मुंबईतील टीव्ही अभिनेत्रीसह तिघींची सुटका

गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने पणजीजवळील सांगोल्डा गावात एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला असून, एका टीव्ही अभिनेत्रीसह तीन महिलांची मुंबईतून सुटका करण्यात आली आहे. तसेच हैदराबादमधून एका व्यक्तीला अटक केल्याची माहिती गोवा पोलिसांनी दिली आहे(High profile sex racket exposed in Goa! Mumbai TV actress and three others released).

    पणजी : गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने पणजीजवळील सांगोल्डा गावात एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला असून, एका टीव्ही अभिनेत्रीसह तीन महिलांची मुंबईतून सुटका करण्यात आली आहे. तसेच हैदराबादमधून एका व्यक्तीला अटक केल्याची माहिती गोवा पोलिसांनी दिली आहे(High profile sex racket exposed in Goa! Mumbai TV actress and three others released).

    हाफिज सय्यद बिलाल नावाचा व्यक्ती वेश्याव्यवसायात गुंतल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. याशिवाय गोव्यात सांगोल्डा गावाजवळ 50 हजार रुपये देऊन सौदा करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी मिळाली होती. या माहितीच्या आधारे या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला.

    50 हजारात सौदा ठरला

    हैद्राबाद येथील रहिवासी असलेल्या आरोपीने सांगोल्डा गावाजवळ 50 हजार रुपये देऊन सौदा केल्याचे तपासात समोर आले आहे. 17 मार्च रोजी आरोपी तीन महिलांसह आला असता त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणी पोलीस अद्याप तपास करत असून या सेक्स रॅकेटशी संबंधित अनेक महत्त्वाची नावे समोर येण्याची शक्यता आहे.

    गुन्हा अन्वेषण विभागाचे क्राइम ब्रॅंच पोलिस निरीक्षक राहुल परब यांनी काल संध्याकाळी सांगोल्डा येथे वेश्याव्यवसाय प्रकरणी घातलेल्या छाप्यात वेश्या दलाल अफिझ सय्यद बिलाल (37) याला अटक केली आहे. त्याने ग्राहकांना देण्यासाठी आणलेल्या तीन महिलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.