युवकाचा खून केल्याप्रकारणी हिंजवडी पोलिसांकडून तीन जणांना अटक

जांभे येथे राजू यादव या युवकाचा खून केल्याप्रकारणी हिंजवडी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. अद्याप खुनाचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही. वैभव पंडित, समाधान परिहार (वय 22, रा. मारुंजी) करण जयस्वार (वय 24, रा. वाकड) अशी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींची नावे आहेत.

    पिंपरी : जांभे येथे राजू यादव या युवकाचा खून केल्याप्रकारणी हिंजवडी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. अद्याप खुनाचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही. वैभव पंडित, समाधान परिहार (वय 22, रा. मारुंजी) करण जयस्वार (वय 24, रा. वाकड) अशी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींची नावे आहेत.

    जांभे येथील रसिकवाडी येथे शुक्रवारी (17 जून) राजू यादव (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) या युवकाचा हत्याराने पाठीवर व दंडावर वार करून अज्ञात इसमांनी खून केला होता. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तुकाराम खडके यांनी रात्री 11 वा फिर्याद दाखल केली. याप्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप देशमुख तपास करत आहेत.