
घराच्या खिडकीतून नोटांच्या गड्ड्या असलेली एक बॅग खाली फेकण्यात येते. खाली उभा असलेला तरुम ही बॅग कॅच करतो. तसचं बॅगमधून पडलेले पैशांच्या गड्ड्याही तो उचलताना दिसतोय. त्यानंतर बॅग घेऊन तो तिथून निघून जातो. आता सीबीआय अधिकाऱ्यांनी हा व्हिडिओ जवरीमल यांच्या घराखालचा असल्याचं सांगितलंय.
बिकानेर : परराष्ट्र व्यापार महासंचलनालयाचे संयुक्त संचालक जवरीमल बिष्णोईंनी (Jawarimal Bishnoi, Joint Director, Directorate General of Foreign Trade) ऑफिसवर सीबीआयचा छापा पडलेला असताना (CBI Raid On Office), आत्महत्या (Suicied) केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. या लाचखोरी प्रकरणातील (Bribery Case) एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सीबीआय छाप्यापूर्वी एका दिवसाचा म्हणजेच २४ मार्चचा आहे. त्यावेळी सीबीआयनं जवरीमल यांना लाच घेताना अटक केली होती.
या व्हिडिओत घराच्या खिडकीतून नोटांच्या गड्ड्या असलेली एक बॅग खाली फेकण्यात येते. खाली उभा असलेला तरुम ही बॅग कॅच करतो. तसचं बॅगमधून पडलेले पैशांच्या गड्ड्याही तो उचलताना दिसतोय. त्यानंतर बॅग घेऊन तो तिथून निघून जातो. आता सीबीआय अधिकाऱ्यांनी हा व्हिडिओ जवरीमल यांच्या घराखालचा असल्याचं सांगितलंय. ती बॅग जवरीमल यांच्या पत्नीनं फेकली होती आणि जवरीमल यांच्या पुतण्यानं ती बॅग घेऊन तो तिथून निघून गेल्याचं सांगण्यात आलंय. जवरीमल यांच्याकडे इतकी रोख रक्कम कुठून आली याचा सीबीाय तपास करीत आहे.
या घटनेनंतर जवरीमल यांना सीबीआय कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या कार्यालयात छापेमारी सुरु होती. त्यावेळी चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन जवरीमल यांनी आत्महत्या केलीय.
सीबीआयनं जवरीमल यांची हत्या केल्याचा आरोप
सीबीआयनेच ही हत्या केल्याचा आरोप, मृत जवरीमल यांचे भाऊ संजय कुमार आणि मित्र अभिषेक मिश्रा यांनी केलाय. या प्रकरणात या सीबीआय अधिकाऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आलीय. मृ्तयूनंतर पोस्टमार्टेम करण्यात आले त्यानंतर मृतदेह कुटुंबीयांना सोपवण्यात आला.
५ लाखांची लाच घेताना केली होती अटक
लाच घेतल्याप्रकरणी सीबीायनं जवरीमल यांच्याविरोधात कारवाई केली होती. या प्रकरणात सीबीआयनं सापळा रचला होता. या सापळ्यात पाच लाख रुपये घेताना त्यांना रंगेहात अटक करण्यात आली. एका व्यापाऱ्याची ५० लाखांची बँक गॅरंटी माफ करण्यासाठी ही लाच घेण्यात येत होती.