horrible shocking crime angry young man burns friend alive for applying color on holi telangana nrvb

नकार दिल्यानंतरही मित्राने तरुणाला धुळवडीत रंग लावला. संतापलेल्या तरुणाने आपल्या मित्रावर पेट्रोल ओतून जिवंत जाळले. या घटनेत तो ३५ टक्के भाजला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध भादंवि कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळवडीला आपल्या मित्राला रंग लावणं एकाच्या चांगलंच अंगलट आलं आहे. रंग लावल्यानंतर तरुण इतका चिडला की त्याने मित्राला पेटवून दिले. या घटनेत मित्र गंभीररित्या भाजला. तो धोक्याबाहेर असला तरी त्याच्या शरीराचा ३५ टक्के भाग भाजला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ७ मार्च (मंगळवार) रोजी मेडक जिल्ह्यातील रेगोंदे येथील मारपल्ली येथे घडली. ७ मार्च रोजी येथे होळी खेळली गेली. मारपल्ली येथील बी अंबादास उर्फ अंजय्या हा होळी खेळत होता. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शब्बीर फार्मकडे जात असताना त्याला त्याचा मित्र सापडला.

शब्बीरला अंबादास व इतरांनी एकत्र रंग लावल्याने त्याला थांबवले. मात्र, शब्बीरने त्या लोकांना रंग लावण्यास नकार दिला. पण, ते लोक राजी झाले नाहीत आणि त्यांनी शब्बीरला रंग लावण्यास सुरुवात केली.

पेट्रोल ओतले आणि बी. अंबाराजला पेटवून दिलं

नकार देऊनही रंग लावल्याने शब्बीरला राग आला. त्याने पेट्रोलने भरलेली बाटली घेऊन अंबाराजवर ओतली, नंतर पेटवून देत घटनास्थळावरून पळ काढला. आगीने वेढलेल्या अंबाराजने आरडाओरडा सुरू केला. आजूबाजूच्या लोकांनी कशीतरी आग विझवून त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले. तसेच पोलिसांना घटनेची माहिती दिली.

३५ टक्के भाजला अंबाराज

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबाराजचे शरीर ३५ टक्के भाजले आहे. त्याचा वरचा भाग अधिक जळाला आहे. मात्र, तो धोक्याबाहेर आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

आरोपीला अटक

त्याचवेळी पोलिसांनी मारपल्ली येथे पोहोचून आरोपी शब्बीरला अटक केली. त्याच्याविरुद्ध एससी-एसटी कायद्यांतर्गत तसेच आयपीसीच्या कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.