प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

अमेरिकेतील 71 वर्षीय लेखिका नॅन्सी क्रॅम्प्टन ब्रॉफीला तेथील स्थानिक न्यायालयाने तिच्या पतीच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जून 2018 मध्ये पतीची हत्या केल्याचा आरोप नॅन्सीवर लावण्यात आला होता. गेल्या महिन्यात म्हणजे मे 2022 मध्ये क्रॅम्प्टन ब्रॉफी यांना न्यायालयाने पतीच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवले होते(How to kill a husband? Life imprisonment for a blogger). या प्रकरणात सर्वांत जास्त चर्चिलेली गोष्ट म्हणजे नॅन्सीने तिच्या ब्लॉगवर लिहिलेली एक पोस्ट.

    लेखिका असलेल्या ब्रॉफीने तिच्या ब्लॉगवर एक विचित्र गोष्ट लिहिली होती. तिच्या या ब्लॉगचे शीर्षक होते – ‘हाऊ टू मर्डर युवर हसबंड’ म्हणजेच आपल्या पतीची हत्या कशी करावी? जर रोमँटिक कादंबरीतील एक पात्र तिच्या पतीची हत्या करणार असेल तर त्यामागे तिचे कोणते पाच हेतू असू शकतील आणि हत्या करण्यासाठी कोणती हत्यारे वापरणे योग्य ठरेल याविषयी नॅन्सीने आपल्या ब्लॉगवर लिहिले आहे.

    तिने आपल्या 63 वर्षीय पती डेनियर ब्रॉफीचवर दोन गोळ्या झाडल्या. म्हणून ऑरेगनमधील पोर्टलँड ज्युरीने तिला सेकंड डिग्री मर्डरसाठी दोषी ठरवले आहे. तिच्यावर हत्येचा आरोप करणारे वकील शॉन ओव्हरस्ट्रीट सांगतात की, हत्या करण्यापूर्वी लेखिका आर्थिक अडचणींना तोंड देत होती. तिने पतीच्या हत्येची जी योजना आखली होती त्यासंबंधीचे पुरावे ओव्हरस्ट्रीट यांनी कोर्टात सादर केले.