बायकोच्या पोटात चाकूने सपासप वार केले आणि मग नवऱ्याने… घरगुती भांडणाचा लेकरांवर भयानक परिणाम

घरगुती भांडणातून पत्नीचा खून करुन पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत पती-पत्नीचा जीव गेल्याने त्यांचे तीन चिमुकले अनाथ झाले आहेत. नांदेड जिल्ह्यातील माहुर तालुक्यातील कासार पेठ येथे ही दुर्देवी घटना घडली आहे(Husband commits suicide by killing wife).

    नांदेड : घरगुती भांडणातून पत्नीचा खून करुन पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत पती-पत्नीचा जीव गेल्याने त्यांचे तीन चिमुकले अनाथ झाले आहेत. नांदेड जिल्ह्यातील माहुर तालुक्यातील कासार पेठ येथे ही दुर्देवी घटना घडली आहे(Husband commits suicide by killing wife).

    विजय गुलाब जाधव आणि निशा विजय जाधव अशी मृत झालेल्या पती पत्नीची नावं आहेत. माहितीनुसार दोघा पती-पत्नीमध्ये काही दिवसांपासून घरगुती वाद सुरू होते. शुक्रवारी सुद्धा शेतात गेले असताना विजय आणि निशा यांच्यात वाद झाला. वाद एवढा विकोपाला गेला की, विजयने पत्नी निशाच्या पोटात चाकूने सपासप वार केले.

    या घटनेत निशा यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर विजयने सुद्धा विष प्राशन करून आत्महत्या केली. दरम्यान, पती पत्नीच्या भांडणात दोन मुली आणि एक मुलगी असे पोरके झालेत. या दुर्दैवी घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात सिंदखेड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.