पत्नीची हत्या करुन मृतदेह जमिनीत गाडून त्यावर पेरली बाजरी! संशयी स्वभावाच्या पतीने अजब पद्धतीने केला नात्याचा अंत

अंजूचे दिनेशसोबत अनेकदा भांडण झाले होते. त्यामुळे संतापाच्या भरात त्याने तिचा खून केला आणि फावड्याने खोदलेल्या चार फूट खोल खड्ड्यात तिचा मृतदेह पुरला.

  उत्तर प्रदेश:  फाजलगड (Fazalgarh) येथे पतिने अजब पद्धतीने पत्नीची हत्या (Husband Killed His Wife)केल्याची घटना उघडकीस आली आहे. 24 जानेवारीपासून गावातून बेपत्ता असलेल्या विवाहित महिलेचा तिच्या पतीनेच खून केल्याच उघडकीस आलं आहे. पत्नीचे दुसऱ्या तरुणावर प्रेमसंबध (Extra Marrital Affair) असल्याने त्याने पत्नी अंजूचा (32)  गळा आवळून खून केल्याच समोर आलं आहे. तिची हत्या करुन मृतदेह जमिनीत गाडून त्यावर बाजरी पेरली. महत्त्वाच म्हणजे, मृतदेह न मिळाल्यास पोलिस कारवाई करण्यास हतबल होतात, असे एका चित्रपटात पाहिले होते, त्यामुळे ही युक्ती लढवली त्याने चौकशीदरम्यान सांगितले.

  मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी नवीन युक्ती

  संतापाच्या भरात पत्नीची हत्या करणारा आरोपी  दिनेशने हा हातगाडीवर भाजी विकण्याचं काम करतो. त्याने पोलिसांना सांगितले की, २५ रोजी पहाटे ४ वाजता खून केल्यानंतर तिचा त्याने मृतदेह खांद्यावर टाकून २०० मीटरपर्यंत नेला. उसाच्या शेताच्या परिसरात असलेल्या  नाल्याजवळ त्याने फावड्याने खोदलेल्या चार फूट खोल खड्ड्यात तिचा मृतदेह पुरला. मृतदेह वितळवण्यासाठी 30 किलो मीठ टाकले. नंतर माती टाकून खड्डा बंद केला. यानंतर त्यावर बाजरीच्या बिया पेरल्या जेणेकरून रोप आल्यावर खड्डा दिसणार नाही. इतकचं नव्हे तर, कोणताही प्राणी खड्डा खणू नये म्हणून त्याभोवती लोखंडी काटेरी तार टाकली. त्यानंतरही ते कुणी पाहू नये यासाठी तो सतत पहारा देत होता. 

  आरोपीने दिली खुनाची कबुली

  दरम्यान, अंजूच्या आईने सांगितले की, अंजूचे दिनेशसोबत अनेकदा भांडण झाले होते. त्यावर पोलिसांनी दिनेशची कसून चौकशी केली असता, त्याने खुनाची कबुली दिली. त्याच्या सांगण्यावरून पोलिसांनी खड्डा खोदून मृतदेह बाहेर काढला.

  आधीच केली मारण्याची प्लॅनिंग

  दिनेशने खुनाची कबुली दिली आहे. सात दिवसांपूर्वी त्याने पत्नीच्या प्रेमप्रकरणाला विरोध केल्याचे त्याने सांगितले आहे. यावर पत्नीने त्याला चिमट्याने मारहाण केली होती. तेव्हाच त्याला मारण्याचा निर्णय घेतला असे त्याने सांगितले. पोलिसांनी आरोपी दिनेशला अटक करून त्याच्या सांगण्यावरून मृतदेह जप्त केला आहे.