झोपलेल्या पत्नीच्या तोंडात इलेक्ट्रिक वायर घातली आणि स्वीच चालू केला; संशयातून पतीनं पत्नीची कृरपणे केली हत्या!

अनैतिक संबंधांचा संशय घेऊन वृद्धाने पत्नीचा विजेचा धक्का देऊन खून केला. हत्येनंतर आरोपीने पोलीस चौकीत आत्मसमर्पण केले.

    आजकाल नातेसंबधात क्षुल्लक क्षुल्लक गोष्टीवरुन भांडण होऊन नात्यात वितुष्ट येतं आणि हेचं नातं संपवण्याला कारण ठरतं. कधी कधी नात्यात आलेला दुरावा, संशयानं घेतलेली जागा नातं तोडण्यासोबत गुन्हे घडण्यालाही कारणीभूत ठरतं. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशमधून समोर आला आहे. अनैतिक संबंधांचा संशय घेऊन वृद्धाने पत्नीचा विजेचा धक्का देऊन खून (husband killed wife with electric shock) केला. हत्येनंतर आरोपीने पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलं. आरोपीच्या मुलाच्या तक्रारीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

    नेमकं काय घडलं

    उत्तराखंडमधील रुरकी येथील लांडौरा येथे ही घटना घडली.उत्तर प्रदेशातील बुढाना येथील रहिवासी हमीद (६०) हे लांडौरा येथील बसस्थानकाजवळ मुलगा तालिफ कुटुंबासह राहतात. गुरुवारी रात्री हमीद त्याची पत्नी खातून (52) आणि सहा वर्षांची मुलगी शबनम यांच्यासह एका खोलीत झोपला होता, तर कुटुंबातील इतर सदस्य दुसऱ्या खोलीत झोपले होते. रात्री एक वाजण्याच्या सुमारास हमीदने विजेच्या तारेचे एक टोक प्लगला लावले आणि दुसरे टोक पत्नीच्या तोंडात घातल्याचा लावले. विजेचा धक्का लागल्याने खातून यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर हमीदने रात्रीच पोलीस चौकी गाठून आत्मसमर्पण केले.

    पोलिसांसमोर आत्मसमर्पण

    हमीदने पोलिसांना सांगितले की, त्याला त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता आणि त्यामुळे त्याने खातूनची हत्या केली. पोलिसांनी हमीदला ताब्यात घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. हमीद यांचा मुलगा नदीम याच्या तक्रारीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.

    सहा वर्षाच्या मुलीला धमकावून केलं गप्प

    कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, हमीद आपल्या पत्नीला विद्युत प्रवाह लावून मारत असताना तिच्याजवळ झोपलेल्या सहा वर्षांच्या शबनमचे डोळे उघडले. हमीदने मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन घाबरवले होते. धमकीच्या भीतीने ती काहीच बोलली नाही. त्यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांना हत्येची माहिती तेव्हाच लागली, जेव्हा हमीदने पोलिसांकडे जाऊन आत्मसमर्पण केलं.