पोलीस आयुक्त विशाल धुमे बुधवारपर्यंत निलंबित न झाल्यास, शुक्रवारी औरंगाबाद बंद; खा. इम्तियाज जलीलांचा इशारा, कोण आहे विशाल धुमे? वाचा नेमकं काय आहे प्रकरण…

एका गृहिणीचाही विनयभंग केल्याचा आरोप देखील आहे. या घटनेने संतप्त झालेल्या नागरिकांमध्ये खळबळ उडाली असून, सरकारने त्यांना आतापर्यंत निलंबित का केले नाही, असा सवाल केला जात आहे. एवढा गंभीर गुन्हा करूनही त्याला जामीन कसा मिळू शकला, असा सवालही ते करत असून, शहर पोलिस (Police) ठाण्याच्या कारभारावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

  औरंगाबाद– वादग्रस्त सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) विशाल धुमे (Vishal Dhume) यांना बुधवारपर्यंत निलंबित न केल्यास शुक्रवारी शहर बंद पाळण्यात येणार असून, पोलीस आयुक्त कार्यालयावर नागरिकांचा मोर्चा काढण्यात येणार आहे, असं खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी नागेश्वरवाडी येथील पीडितेच्या घरी भेट दिली यावेळी त्यांनी ही माहिती दिली. जेथे पूर्ण मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एसीपीने त्याच्या जवळ येणाऱ्या कोणालाही मारहाण केली. त्याने एका गृहिणीचाही विनयभंग केल्याचा आरोप देखील आहे. या घटनेने संतप्त झालेल्या नागरिकांमध्ये खळबळ उडाली असून, सरकारने त्यांना आतापर्यंत निलंबित का केले नाही, असा सवाल केला जात आहे. एवढा गंभीर गुन्हा करूनही त्याला जामीन कसा मिळू शकला, असा सवालही ते करत असून, शहर पोलिस (Police) ठाण्याच्या कारभारावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

  …तर बंदचा इशारा

  दरम्यान, खा. जलील यांनी डीजीपी श्री रजनीश सेठ यांच्याशी बोलले आणि त्यांनी सांगितले की, अधिकाऱ्याला कठोर शिक्षा दिली जाईल. पोलीस दलाचे नाव बदनाम करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित न केल्यास शुक्रवारी सर्व राजकीय, सामाजिक संघटना आणि नागरिक एकत्र येऊन बंद पाळतील आणि क्रांतीचौक ते मिल कॉर्नरवरील सीपी कार्यालयापर्यंत मोर्चा काढतील, अशी माहिती त्यांनी डीजींना दिली. बुधवारपर्यंत आरोपी अधिकाऱ्यावर आणखी काही कठोर कलमे लावायला हवी होती, असे ते म्हणाले.

  काय आहे प्रकरण?

  एसीपी ढुमे गेल्या वर्षी अहमदनगरलाही असेच प्रकार त्यांच्या नावावर आहेत. अहमदनगर जिल्ह्यात पोलिस उपअधीक्षक म्हणून त्यांच्याकडे कोतवाली आणि तोफखानासह शहरातील अन्य चार पोलिस स्टेशनचा प्रभार होता. त्या वेळी दारू पिऊन अशाच प्रकारे नागरिकांना त्रास देण्याच्या अनेक तक्रारी त्यांच्या विरोधात पोलिसात गेल्या होत्या. त्यावर डीएसपी मनोज पाटील यांनी खातेनिहाय चौकशीची शिफारस केली होती. ती सुरू असतानाच त्यांची औरंगाबादला बदली झाली. त्यानंतर त्याने औरंगाबादमध्ये एका महिलेचा विनयभंग केला आहे. महिलेनं तक्रारीत म्हटलंय की, एसीपी विशाल ढुमे यांच्या विकृत प्रतापाची आपबिती स्वतः पीडिते सांगितली आहे. माझ्या पाच वर्षीय मुलीला एसीपी ढुमे जबरदस्तीने जवळ घेई,  सासूबाईंना सांगितले खाली जा आणि मुलीला खोलीत ठेवून बाहेरून कडी लावली. तरीही ढुमे आमच्याच बेडरूममधील वॉशरुममध्ये जाण्यासाठी माझे पती आणि दिरांशी हुज्जत घालत होते. हात उगारत होते. माझ्या सासूबाई त्यांना विनवत होत्या, साहेब तुम्ही निघून जा. त्यांना पाणीही दिले. तरीही त्यांची शिवीगाळ आणि अरेरावी सुरूच होती. तसेच अनेकवेळा कुठेह स्पर्श करी असं पीडित महिलेनं सांगितलं आहे.

  खातेनिहाय चौकशी सुरू

  दारूच्या नशेत पाशवी झालेल्या एसीपी ढुमेचे हे रूप औरंगाबाद शहराला आत्ता दिसते आहे. मात्र, यांचे प्रताप जुने आहेत. गेल्याच वर्षी अहमदनगरलाही असेच प्रकार त्यांच्या नावावर आहेत. अहमदनगर जिल्ह्यात पोलिस उपअधीक्षक म्हणून त्यांच्याकडे कोतवाली आणि तोफखानासह शहरातील अन्य चार पोलिस स्टेशनचा प्रभार होता. त्या वेळी दारू पिऊन अशाच प्रकारे नागरिकांना त्रास देण्याच्या अनेक तक्रारी त्यांच्या विरोधात पोलिसात गेल्या होत्या. त्यावर डीएसपी मनोज पाटील यांनी खातेनिहाय चौकशीची शिफारस केली होती. ती सुरू असतानाच त्यांची औरंगाबादला बदली झाली.