कुडाळ येथील अबोली धाब्यावर 5 लाख 96 हजार रुपयांची बेकायदा दारू जप्त मेढा पोलिसांची धडक कारवाई 

कुडाळ तालुका जावळी येथे अबोली धाब्यावर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात मध्ये येथे सुरू असणाऱ्या बेकायदा दारू अड्ड्यावर पाच लाख 96 हजार रुपयाचा दारू मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. 

    कुडाळ : कुडाळ तालुका जावळी येथे अबोली धाब्यावर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात मध्ये येथे सुरू असणाऱ्या बेकायदा दारू अड्ड्यावर पाच लाख 96 हजार रुपयाचा दारू मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

    याप्रकरणी दीपक शामराव वारागडे व विक्रम गोरखनाथ गोंधळी यांच्यावर अवैद्य बेकायदा दारू विक्री प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास अज्ञात खबऱ्याकडून अबोली धाब्यावर दारूची बॉक्स भरलेली बोलेरो गाडी येणार असल्याची माहिती मिळाली.

    यावर पोलिसांनी अबोली धाब्यावर चारी बाजूंनी सापळा रचला. व बोलेरो गाडी येताच गाडी मधील असणाऱ्या वस्तूची तपासणी केली .यातच गाडीच्या डिग्गी मध्ये बेकायदा दारूचे बॉक्स निदर्शनास आले. या प्रकरणी सर्व गाडीतील दारूचे बॉक्स पोलिसांनी ताब्यात घेतले. व धाब्याची पूर्णतः तपासणी केली. यामध्ये विक्रम गोरखनाथ गोंधळी. राहणार कुडाळ हा दारूच्या बाटल्या विकत असताना देखील निदर्शनास आला आहे. त्या ठिकाणी दीपक शामराव वारागडे हा घटनास्थळावरून पळून गेला. दरम्यान अबोली धब्यातून 46 हजार वीस रुपयाचा दारू देशी विदेशी स्वरूपातील बाटल्या व दारूची वाहतूक करणारी बोलेरो असे एकूण पाच लाख 96 हजार रुपयाचा दारू मुद्देमाल जप्त करण्यात आला असून .आरोपी दीपक वारागडे व विक्रम गोंधळी व दोघे ही यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने करीत आहेत. या कारवाईमध्ये हेडकॉन्स्टेबल इमरान मेटकरी, शेख, काळे ,यांनी सहभाग घेतला.