यमाकडून पतीचे प्राण आणण्याऐवजी या बाईने वट पौर्णिमेच्या आधीच दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी

बीडमधली एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीच्या विम्याचे एक कोटी रुपये मिळावेत यासाठी पत्नीचे पतीच्या हत्येची सुपारी दिली होती. अपघातात पती गेल्याचा बनाव करत त्याचा खून करण्यात आला(In Beed, the wife plotted to kill her husband).

    बीड : बीडमधली एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीच्या विम्याचे एक कोटी रुपये मिळावेत यासाठी पत्नीचे पतीच्या हत्येची सुपारी दिली होती. अपघातात पती गेल्याचा बनाव करत त्याचा खून करण्यात आला(In Beed, the wife plotted to kill her husband).

    बीडमध्ये ही घटना घडली आहे. अहमदनगर महामार्गावरच्या बीड पिंपरगव्हाण रस्त्यावर एका व्यक्तीचा मृतदेह रस्त्यावर आढळला. यात दुचाकीला एका वाहनाने धडक दिल्याचं दिसत होतं. या व्यक्तीच्या पत्नीला मात्र पतीच्या मृत्यूबद्दल काहीच दु:ख वाटत नव्हतं. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी जरा खोलात जाऊन तपास केला. त्यानंतर लक्षात आलं की या मृत इसमाच्या डोक्यावर गंभीर वार करण्यात आले होते.

    त्यानंतर टेम्पो आणि दुचाकीची धडक झाली आणि अपघात झाल्याचा बनाव रचण्यात आला होता. आणि मृतदेहाला रस्त्यावर फेकण्यात आलं होतं. तपासाअंती खुलासा झाला की पत्नीनेच पतीचा एक कोटी रुपयांचा विमा मिळवण्यासाठी सुपारी देऊन त्याचा खून केला होता. तिने पतीच्या हत्येसाठी मारेकऱ्यांना दहा लाखांची सुपारीही दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.