मुलीचे कापलेले पाय प्लास्टिकच्या पिशवीत भरुन पोलिस ठाण्यात आला बाप; तक्रार ऐकून पोलिसांचाही थरकाप उडाला

बिहारमधील भोजपूरमधील मुफसिल पोलीस स्टेशन हद्दीत क्रूरतेचा कळस गाठणारी भयानक घटना घडली आहे. मुलीचे कापलेले पाय प्लास्टिकच्या पिशवीत भरुन एक पिता पोलिस ठाण्यात दाखल झाला. या पित्याची तक्रार तक्रार ऐकून पोलिसांचाही थरकाप उडाला(Terrible Crime).

    या पित्याने मुलीच्या पायातील पैजन आणि जोडव्यांवरुन तिच्या मृतदेहाची ओळख पटवली. मुलीच्या सासरकडच्या लोकांनी मुलीची हत्या केल्याचा दावा या पित्याने तक्रारीत केला आहे.  आरोपी अद्याप फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

    वर्षभपूर्वी मुलीचा विवाह झाला होता.  तिचा नवरा आणि सासरे माहेरच्या मंडळींकडून पैसे आणण्यासाठी दबाव आणत होते. यासाठी ते तिचा छळ करत होते. यातूनच त्यांनी तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या वडिलांनी हे समजताच ते मुलीच्या सासरी दाखल झाले. तिचा मृतदेह प्रथम पुरण्यात आला. यानंतर तो जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. अखेरीस पित्याला आपल्या मुलीचे पाय दिसले.

    यामुळे मुलीची हत्या झाल्याचा संशय पित्याला आला. हे पाय पाय पिशवीत भरुन ते थेट पोलिस ठाण्यात दाखल झाले आणि त्यांनी मुलीचे पती आणि सासऱ्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. दोघेही फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.