ती जिवंत असताना नराधमाचं मन भरल नाही, खून करुन तिच्या मृतदेहावरही तो बलात्कार करत राहिला

माणुसकीच्या सर्व मर्यादा पार करणारी अत्यंत धक्कादायक घटना तेलंगणामध्ये घडली आहे. एका नराधमाने विवाहितेची हत्या करुन तिच्या मृतदेहावरही बलात्कार केला आहे(In Telangana, a woman was murdered and her body raped ).

    माणुसकीच्या सर्व मर्यादा पार करणारी अत्यंत धक्कादायक घटना तेलंगणामध्ये घडली आहे. एका नराधमाने विवाहितेची हत्या करुन तिच्या मृतदेहावरही बलात्कार केला आहे(In Telangana, a woman was murdered and her body raped ).

    मृत महिला आपल्या पतीसह यादाद्री भुवनागिरी जिह्ल्यातील चौतुप्पल गावात राहत होती. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार मृत महिलेचा पती सुरक्षारक्षकाचे काम करत होता. तो कामावर गेला असताना नराधमानाने तिच्यावर अत्याचार केला.

    आरोपी हा मृत महिलेच्या घराजवळ राहत होता. मागील अनेक दिवसांपासून तो महिलेच्या पतीच्या कामावर येण्या-जाण्याच्या वेळांवर पाळत ठेवून होता. अखेर संधी साधत महिलेचा पती कामावर गेला असताना आरोपी यांच्या घरात घुसला.

    आरोपीने जबरदस्तीने महिलेवर अत्याचार केला. महिलेने विरोध केला असता आरोपीने महिलेचे डोकं भिंतीवर आपटून तिची हत्या केली. यानंतर आरोपीने महिलेच्या मृतदेहावर बलात्कार केला. यानंतर मृत महिलेच्या अंगावरील दागिने चोरुन आरोपीने पलायन केले.

    महिलेचा पती कामावरुन घरी आला असता. त्याला त्याची पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. पोलिसांनी तात्काळ परिसरातील नागरीकांची चौकशी केली. यावेळी आरोपीजवळ महिलेचे दागिने सापडल्यानंतर त्याने आपल्या कृत्याची कबूली दिली.