मेक्सिकोमध्ये अंदाधुंद गोळीबार, १० जणांचा मृत्यू

मेक्सिकोमध्ये गोळीबारात १० जणांचा मृत्यू झाला आहे. आज बंदूकधारी व्यक्तीने सेंट्रल मेक्सिकोमधील एका बारमध्ये अंदाधुंद गोळीबार केला. मे महिन्यातही अशीच घटना घडली होती. मेक्सिकोच्या मध्य शहरातील हॉटेल आणि दोन बारमध्ये करण्यात आलेल्या गोळीबारात १० लोकांनी जीव गमावला होता.

    मेक्सिको सिटी : मेक्सिकोमध्ये (Mexico) गोळीबारात (Firing) १० जणांचा मृत्यू झाला आहे. आज बंदूकधारी व्यक्तीने सेंट्रल मेक्सिकोमधील एका बारमध्ये (Bar) अंदाधुंद गोळीबार केला. मे महिन्यातही अशीच घटना घडली होती. मेक्सिकोच्या मध्य शहरातील हॉटेल आणि दोन बारमध्ये करण्यात आलेल्या गोळीबारात १० लोकांनी जीव गमावला होता.

    स्टेट अॅटर्नी जनरल ऑफिसने (State Attorney General Office) दिलेल्या माहितीनुसार, सेंट्रल मेक्सिकोमध्ये मार्च महिन्यात १९ लोकांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. अनेकजण जखमी होते, ज्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

    जानेवारी महिन्यात एकाच कुटुंबातील (Family) सहा जणांची हत्या करण्यात आली होती. चार महिन्यातील ही पाचवी घटना होती. डिसेंबर २००६ मध्ये सरकारने वादग्रस्त लष्करी अमलीपदार्थविरोधी ऑपरेशन (Anti Narcotics Operation) सुरू केल्यापासून मेक्सिकोमध्ये तीन लाखांहून हून अधिक हत्या झाल्याची अधिकृत आकडेवारी आहे.