जीभेऐवजी डॉक्टरांनी केलं प्रायव्हेट पार्टचं ऑपरेशन, डॉक्टर म्हणाले खतना करुन मुलाला केलं मुस्लीम

या घटनेची माहिती हिंदू संघटनांना कळाल्यानंतर त्या ही आक्रमक झाल्या आणि ते हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. आता या कुटुंबांवर तडजोड करण्यासाठी डॉक्टरांकडून दबाव टाकण्यात येतोय. तर हिंदू संघटना या डॉक्टर आणि हॉस्पिटलवर कारवाईच्या मागणीसाठी आग्रही आहेत. डॉक्टरांनी जाणीवपूर्वक मुलाच्या जीभेचं ऑपरेशन न करता त्याची खतना करुन त्याला मुस्लीम केल्याचा आरोप हिंदू संघटनांनी केलाय.

  बरेली – डॉक्टरांच्या (doctor) बेपर्वाईचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हॉस्पिटलमध्ये (Hospital) डॉक्टरांनी चुकीची शस्त्रक्रिया केलीय़. बेपर्वाई पण इतकी भयंकर आहे की जीभेच्या (tongue) ऐवजी अडीच वर्षांच्या मुलाच्या प्रायव्हेट पार्टचं ऑपरेशनच डॉक्टरांनी करुन टाकलं. अडीच वर्षांच्या या मुलाची जीभ टाळूला चिकटलेली होती, त्याऐवजी थेट डॉक्टरांनी प्रायव्हेट पार्टचं ऑपरेशन करुन त्याची खतनाच करुन टाकलीय. जेव्हा या मुलाच्या कुटुंबीयांना हा प्रकार समजला त्यावेळी त्यांचा प्रचंड संताप झालाय. या घटनेची माहिती हिंदू संघटनांना कळाल्यानंतर त्या ही आक्रमक झाल्या आणि ते हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. आता या कुटुंबांवर तडजोड करण्यासाठी डॉक्टरांकडून दबाव टाकण्यात येतोय. तर हिंदू संघटना या डॉक्टर आणि हॉस्पिटलवर कारवाईच्या मागणीसाठी आग्रही आहेत. डॉक्टरांनी जाणीवपूर्वक मुलाच्या जीभेचं ऑपरेशन न करता त्याची खतना करुन त्याला मुस्लीम केल्याचा आरोप हिंदू संघटनांनी केलाय.

  नेमका काय घडलाय प्रकार

  उ. प्रदेशातील बरेली जिल्ह्यात ही घटना समोर आलेली आहे. संजय नगर परिसरात राहणाऱ्या हरीमोहन यादव यांचा अडीच महिन्यांचा मुलगा सम्राट हा बोलू शकत नव्हता. या मुलाच्या जीभेटं ऑपरेशन म्हणजेच तुतना करण्याचा सल्ला काही जणांनी सम्राटच्या आई वडिलांना दिला. त्यासाठी डेलापीर परिसरात असलेल्या एका खासजी हॉस्पिटलमध्ये सम्राटला दाखल करण्यात आलं. या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर मोहम्मद जावेद यांनी या मुलाचं तितना ऐवजी खतनाचं ऑपरेशन केलं, असा आरोप सम्राटच्या कुटुंबीयांनी केलेला आहे. ज्यावेळी कुटुंबीयांना हे समजलं त्यावेळी ते हैराम झाले. ही बातमी वाऱ्याच्या वेगानं सगळीकडे पसरली. हिंदू जागरण मंचाच्या नेत्यांना हे काळ्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांसह थेट हॉस्पिटलमध्ये धडक दिली.

  डॉक्टरांनी जाणीवपूर्वक कृत्य केल्याचा आरोप

  सम्राटचे वडील हरीमोहन यांचा दावा आहे की डॉक्टरांनी हे ऑपरेशन जाणीवपूर्वक केलंय. आता हॉस्पिटल हरीमोहन यांच्यावर तडजोड करण्यासाठी दबाव टाकत आहेत. तर हरीमोहन या डॉक्टर आणि हॉस्पिटलवर कारवाईसाठी आग्रही भूमिकेत आहे. डॉक्टारांनी जाणीवपूर्वक खतना करुन मुलाला हिंदूपासून मुसलमान केल्याचा आरोप कुटुंबीय करतायेत. डॉक्टरांनी त्याचं नावही विचारलं होतं. त्यामुळे त्यांचा हा कट असल्याचं त्यांचं म्हणणंय. हिंदू मुलाची सुंथा केली म्हणून हिंदू जागरण मंचाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गोंधळ घातलाय. डॉक्टरांवर या प्रकरणात कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. मात्र डॉक्टरांना वाचवण्याचे प्रयत्नही होतायेत. पैशांची तडजोड करुन हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं सांगण्यात येतंय. मात्र डॉक्टरांवर कारवाईबाबत हिंदू संघटना आग्रही आहेत.

  पोलिसांत तक्रार दाखल, डॉक्टर म्हणतोय

  या प्रकरणात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणात चौकशीसाठी समिती स्थापण्यात आलीय. त्यासमितीच्या अहवालानंतर कारवाई होईल असं पोलीस सांगतायेत. डॉक्टर मोहम्मद जावेद यांचं म्हणणं आहे की हे कुटुंब मुलाच्या जीभेच्या ऑपरेशनसाठी आलंच नव्हतं. जी समस्या होती त्याचंच ऑपरेशन करण्यात आलं आहे. विनाकारण हे प्रकरण मोठं करण्यात येतंय. असंही त्यांचं म्हणणंय.