प्रेयसीला रात्री भेटायला जाणं तरुणाला पडलं महागात; चोर समजून प्रेयसीच्या घरच्याकडून मारहाण

    बांदा येथे प्रेयसीला भेटणे एका तरुणाला महागात पडले. बांदा येथील बिसांडा पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील 20 वर्षीय तरुण मिरवणुकीत डीजे वाजवून परतत होता. वाटेत तो त्याच्या मैत्रिणीला तिच्या घरी भेटण्यासाठी गेला होता. मुलीच्या वडिलांनी आणि भावाने मुलाला पाहिले तेव्हा तो चोर आहे असे समजून त्याला खूप मारले. गोंधळ ऐकून आजूबाजूचे लोकही जमा झाले आणि त्यांनी त्यालाही मारले. लाठ्याकाठ्यांनी मारहाण केल्याने मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. चर्चेने प्रकरण शांत झाले, त्यानंतर तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले.