जगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थानचे आजी-माजी विश्वस्त जुगार खेळताना अटक

चाकण एमआयडीसी हद्दीत जुगार अड्डा सुरू असल्याची खबर दरोडाविरोधी पथकाला मिळाली. देहूगाव ते येलवाडी मार्गावरील एक बंदावस्थेत कंपनी आहे. त्या कंपनीच्या पहिल्या मजल्यावर पत्त्यांचा खेळ सुरू होता. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सापळा रचला. यावेळी २६ जण कंपनीत दाखल झाले होते. डाव रंगला असता पोलिसांनी छापा टाकला.

    पुणे : जगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थानच्या (Jagadguru Sant Tukaram Maharaj Sansthan) आजी-माजी विश्वस्तांना जुगार (Gambling) खेळताना रंगेहात अटक केली आहे. त्यांच्यासह देहू नगरपरिषदेचे (Dehu Nagarparishad) नगरसेवक, नगरसेविकेच्या पतीसह सव्वीस जणांना बेड्या ठोकल्या आहेत. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या (Pimpri-Chinchwad Police) या कारवाईनंतर एकच खळबळ उडाली आहे.

    चाकण एमआयडीसी (Chakan MIDC) हद्दीत जुगार अड्डा सुरू असल्याची खबर दरोडाविरोधी पथकाला (Anti Robbery Squad) मिळाली. देहूगाव ते येलवाडी मार्गावरील एक बंदावस्थेत कंपनी आहे. त्या कंपनीच्या पहिल्या मजल्यावर पत्त्यांचा खेळ सुरू होता. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सापळा रचला. यावेळी २६ जण कंपनीत दाखल झाले होते. डाव रंगला असता पोलिसांनी छापा टाकला.

    पोलिसांनी रचलेल्या सापळ्यातून कोणालाच निसटता आले नाही. पोलिसांनी सर्वांची माहिती घेतली असता या २६ जणांमध्ये देहूच्या संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त विशाल केशव मोरे, माजी विश्वस्त संतोष गुलाब मोरेही जुगार खेळत होते. त्यांच्यासह देहू नगरपरिषदेचे नगरसेवक मयूर टिळेकर, एका नगरसेविकेचे पती विशाल परदेशी यांचाही समावेश आहे. अटक केलेल्या २६ जणांकडून ३५ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.