पुलवामा : काळजाचा थरकाप उडवणारी बातमी, त्याला करायचा होता वहिनीवर बलात्कार, विरोध केला तर थेट ढगातच केली रवानगी, अशी शिताफीने केली अटक

माहिती देताना पुलवामा पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले की, गेल्या रविवारी एका महिलेला बेशुद्ध अवस्थेत पंपोर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासणीअंती महिलेला मृत घोषित केले.

    जम्मू-काश्मीरमधील पुलवामा (Jammu Kashmir Pulwama) जिल्ह्यात एक हत्येची (Murder Case) खळबळजनक घटना समोर आली आहे. जिथे दीराने (Brother In Law) आपल्याच वहिनीवर बलात्कार (Sister In Law Rape Attempt) करण्याचा प्रयत्न केला. वहिनीने विरोध केला असता आरोपीने तिची हत्या (Murder) केली. गुन्हा करून आरोपी फरार झाला होता.

    एका एजन्सीला माहिती देताना पुलवामा पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले की, रविवारी एका महिलेला बेशुद्ध अवस्थेत पंपोर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासणीअंती महिलेला मृत घोषित केले.

    या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांची धावपळ उडाली. पोलिसांनी तपास केला असता, महिलेचा दीर तिच्यावर वाईट नजर ठेवत असल्याचे समोर आले. रविवारी त्याची वहिनी घरी एकटी असताना त्याने तिला आपल्या वासनेची शिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेने त्याला कडाडून विरोध केला.

    दोघांमध्ये बाचाबाची झाली. दरम्यान, आरोपी दीराने महिलेचा गळा आवळून खून केला. गुन्हा केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. एका खबऱ्याच्या माहितीवरून पोलिसांनी मंगळवारी आरोपी दीराला अटक केली.