
दिल्ली महिला आयोगाच्या (DCW) अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी सांगितले त्या व्हिडिओची तपासणी करण्यासाठी आणि गुन्हेगारांना अटक करण्यासाठी दिल्ली पोलिसांना नोटीस जारी केली आहे
संपुर्ण देशात होळीचे रंग उधळले जात असताना देशाच्या राजधातीन मात्र, देशाचीच प्रतिमा मलिन करण्याचा प्रकार घडत होता. होळी दरम्यान दिल्लीत एका जपानी महिलेला पुरुषांच्या एका गटाकडून छेडछाड आणि छळ केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. सोशल मिडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ पाहुन देशभरात संतपाची लाट उसळली आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असुन याप्रकरणी तीन मुलांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. जपानी महिला बांगलादेशला रवाना झाली आहे.
नेमकं प्रकरण काय
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पुरुषांचा एक गट एका महिलेवर रंग लावताना दिसत आहे. मात्र तिला रंग लावताना त्यांनी तिच्यासोबत गैरवर्तन केलयं. त्यात एक पुरुष तिच्या डोक्यावर अंडी फोडतानाही दिसत आहे. यामुळे ही तरुणी काहीशी अस्वस्थ झाल्याच दिसतय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला जपानी पर्यटक असून ती राष्ट्रीय राजधानीतील पहाडगंज येथे राहात होती आणि आता ती बांगलादेशला रवाना झाली आहे. एका अल्पवयीन मुलासह तीन मुलांना अटक करण्यात आली असून आरोपींनी घटनेची कबुली दिली आहे, असे पोलिसांनी सांगितले.
दिल्ली महिला आयोगानं घेतली दखल
दिल्ली महिला आयोगाच्या (DCW) अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी सांगितले त्या व्हिडिओची तपासणी करण्यासाठी आणि गुन्हेगारांना अटक करण्यासाठी दिल्ली पोलिसांना नोटीस जारी केली आहे.