jaykumar gore

गोरेंचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने (High Court) फेटाळल्यामुळं गोरेंच्या अडचणी वाढल्या आहेत. मृत्य व्यक्तीची बनावट कागदपत्र तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी अॅट्रॉसिटीचा गुन्हा (Atrocity Act) दाखल झालेले माणचे भाजपाचे आमदार सातारा जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरेंना (Jayakumar Gore) यांना उच्च न्यायालयाने (High Court) मागील महिन्यात तात्पुरता दिलासा दिला होता. परंतू त्यांच्यावर अटकेची (Arrest) टांगती तलवार कायम होती.

    मुंबई : भाजप आमदार जयकुमार गोरेंना (Jayakumar Gore) न्यायालयाने दणका दिला आहे, गोरेंचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने (High Court) फेटाळल्यामुळं गोरेंच्या अडचणी वाढल्या आहेत. मृत्य व्यक्तीची बनावट कागदपत्र तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी अॅट्रॉसिटीचा गुन्हा (Atrocity Act) दाखल झालेले माणचे भाजपाचे आमदार सातारा जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरेंना (Jayakumar Gore) यांना उच्च न्यायालयाने (High Court) मागील महिन्यात तात्पुरता दिलासा दिला होता. परंतू त्यांच्यावर अटकेची (Arrest) टांगती तलवार कायम होती.

    दरम्यान, जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांच्या जामीन अर्जावरील अंतिम सुनावणी पुन्हा आज पार पडली. नऊ जूनला सुनावणी झाली होती, त्यावेळी त्यांना अटक न करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे तात्पुरता दिलासा मिळाला होता, परंतू आज पुन्हा एकदा सुनावणी पार पडली. यावेळी गोरेंचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. तसेच या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी दोन आठवड्यांची स्थगिती देण्यात आली आहे. तोपर्यंत गोरेंविरोधात अटकेची कारवाई न करण्याचे न्यायालयाने निर्देश दिले आहेत. पण त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.