kalyan crime he fought the idea escaped from the 32nd floor of the quarantine center on the basis of a pipe The police also finally arrested

धक्कादायक म्हणजे पोलिसांचे पथक त्याला अटक करण्यासाठी गेले असता गाझी ने मिरचीचा स्प्रे मारून पोलिसांवर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी झडप घालत त्याला बेड्या ठोकल्यात गाझीकडून आत्तापर्यंत तीन मोटरसायकल हस्तगत करण्यात आले तसेच त्याच्याकडून मिरचीचा स्प्रे, दोन चाकू व एक एअरगन देखील जप्त करण्यात आली आहे.

  • खडकपाडा पोलिसांची मोठी कामगिरी
  • चार मोक्काचे गुन्हे आहेत दाखल

कल्याण : दोन वर्षापूर्वी भिवंडी (Bhiwandi) येथील क्वारंटाईन सेंटर (Quarantine Center) मधून ३२ व्या मजल्यावरून (32nd Floor) पाईपच्या आधारे पळून गेलेल्या एका सराईत इराणी चोरट्याला (Irani Thief अखेर खडकपाडा पोलिसांनी (Khadakpada Police) सापळा (Trap) रचत बेड्या ठोकल्यात (Arrested).गाझी दारा इराणी जाफरी असे या आरोपीचे नाव आहे. गाझीविरोधात चार मोका अंतर्गत गुन्हे दाखल करत त्याला अटक करण्यात आली होती. गेल्या दोन वर्षापासून पसार झालेल्या गाझी याने या काळात देखील चोरीचे गुन्हे केल्याचे तपासात उघड झाले.

धक्कादायक म्हणजे पोलिसांचे पथक त्याला अटक करण्यासाठी गेले असता गाझी ने मिरचीचा स्प्रे मारून पोलिसांवर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी झडप घालत त्याला बेड्या ठोकल्यात गाझीकडून आत्तापर्यंत तीन मोटरसायकल हस्तगत करण्यात आले तसेच त्याच्याकडून मिरचीचा स्प्रे, दोन चाकू व एक एअरगन देखील जप्त करण्यात आली आहे.

कल्याण खडकपाडा पोलिसांनी गेल्या काही दिवसापासून आंबिवली येथील इराणी वस्तीमधील इराणी आरोपींच्या विरोधात फार्स आवळण्यास सुरुवात केली आहे. काही कुख्यात चैन स्नॅचरना पोलिसांनी बेड्या ठोकत त्यांची रवानगी जेलमध्ये केली आहे. दोन वर्षांपूर्वी २०२० साली इराणी वस्तीतील सराई चोरटा गाझी दारा इराणी उर्फ जाफरी उर्फ सय्यद या सराईत चोरट्याविरोधात पोलिसांनी मोक्कांतर्गत कारवाई करत त्याला अटक केली होती. अटकेदरम्यान त्याला कोरोना झाल्याने भिवंडी येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये त्याला उपचारासाठी दाखल केलं होतं मात्र या क्वारंट सेंटरमधील ३२ व्या मजल्यावरून मागच्या बाजूला असलेल्या पाईपवरून उतरून गाझी पसार झाला होता.

खडकपाडा पोलीस दोन वर्षापासून गाझीच्या मागावर होते मात्र गाझी पोलिसांना गुंगरा देण्यात यशस्वी ठरत होता. कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त उमेश माने पाटील, वरिष्ठ पोलिस निरिक्षक सज्रेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक शरद जिने , एपिआय अनिल गायकवाड यांचे पथक गाझीचा शोध घेत होते. दरम्यान गाझी हा कल्याण जवळच्या लहुजी नगर परिसरातील एका घरात येणार असल्याची माहिती एपीआय अनिल गायकवाड यांच्या पथकाला मिळाली.

या माहितीनुसार पोलिसांनी लहुजी नगर परिसरातील या घरातच सापळा रचला. गाझी घरात येताच पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र गाझीने आपल्या जवळील असलेल्या मिरची स्प्रे पोलिसांवर मारला. पोलिसांनी अखेर गाझीवर झडप टाकत गाझीला अटक केली.

तपासादरम्यान गाझीने फरार असताना देखील चैन स्नेचींग व दुचाकी चोरणे सुरूच ठेवले होते.. गाझी विरोधात खडकपाडा, कोनगाव ,महात्मा फुले, मानपाडा, बदलापूर, भिवंडी मधील निजामपूर पोलीस ठाण्यात एकूण बारा गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

इरणी चोरट्यांचे नवीन साथीदार

कल्याण जवळील असलेले आंबिवली येथील इराणी वस्ती ही नेहमीच पोलिसांच्या रडारवर असते..आत्तापर्यंत या वस्तीमधून अनेक सराईत चैन स्नॅचर्सना पोलिसांनी अटक केली. काही वर्षांपूर्वी हे इराणी चोरटे वस्तीतीलच साथीदारांच्या मदतीने चोऱ्या करत होते मात्र आता या इराणी चोरट्याने बिगर इराणी असलेल्या लोकांना आपल्या साथीदार बनवत चोऱ्या सुरू केल्याचे काही घटनांवरून दिसून येते. खडकपाडा पोलिसांनी अटक केलेला गाझी हा जयकुमार राठोड याच्यासोबत चोऱ्या करत होता व त्याच्याही पूर्वी जयकुमार राठोडला पोलिसांनी सहा महिने आधीच बेड्या ठोकल्या होत्या.