परदेशी माध्यमांना बातम्या छापायला केजरीवालांनी साडेआठ लाख डॉलर दिले

केजरीवालजी, जर मी महाठग आहे, तर तुम्ही मला दिल्लीच्या सरकारी शाळांच्या प्रमोशनसाठी आंतरराष्ट्रीय पीआरची व्यवस्था करण्यास का सांगितले? न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट यासारख्या वृत्तपत्रांमध्ये पेड न्यूजसाठी ८ लाख ५० हजार डॉलर्स आणि १५ टक्के अतिरिक्त कमिशन दिला, असा दावा सुकेश चंद्रशेखरने केला आहे.

    नवी दिल्ली – मनी लाँड्रिंग (Money Laundering) प्रकरणात अटकेत असलेल्या सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) याने आप नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. आता सुकेशने पाचवे पत्र लिहिले असून यामध्ये अरविंद केजरीवालांनी (Arvind Kejriwal) परदेशी माध्यमांना (Foreign Media) आपल्या बातम्या छापायला साडेआठ लाख डॉलर्स दिल्याचा दावा त्याने या पत्रातून केला आहे.

    सुकेश चंद्रशेखर म्हणतो, केजरीवालजी, जर मी महाठग आहे, तर तुम्ही मला दिल्लीच्या सरकारी शाळांच्या प्रमोशनसाठी आंतरराष्ट्रीय पीआरची व्यवस्था करण्यास का सांगितले? न्यूयॉर्क टाइम्स (Newyork Times), वॉशिंग्टन पोस्ट (Washington Post) यासारख्या वृत्तपत्रांमध्ये पेड न्यूजसाठी (Paid News) ८ लाख ५० हजार डॉलर्स आणि १५ टक्के अतिरिक्त कमिशन दिला, असा दावा त्याने केला आहे.

    आजपर्यंत कोणीही केले नाही, असे प्रमोशन व्हायला हवे, असा त्यांचा उद्देश होता. त्यानंतर आधी संपूर्ण पैसे अमेरिकन खात्यात टाकायला सांगितले होते, पण नंतर सतेंद्र जैन यांनी पूर्ण पेमेंट रोख द्यायला सांगितले. माझ्याकडून तुम्ही पैसे व्हाईट केले, असे सुकेशने पुढे म्हटले आहे. तसेच केजरीवाल, सत्येंद्र जैन यांचीही पॉलिग्राफ चाचणी व्हावी, अशी मागणीही त्याने केली आहे.