10 वीच्या विद्यार्थ्याचं अपहरण करून मागितली 4 कोटींची खंडणी; काही तासांतच पोलिसांनी…

जालन्यात 10 वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचं अपहरण करून अज्ञातानं 4 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची घटना समोर आली आहे. 'स्वयं गादिया' असं अपहरण करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे(Kidnapped 10th standard student and demanded Rs 4 crore ransom).

    जालन्यात 10 वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचं अपहरण करून अज्ञातानं 4 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची घटना समोर आली आहे. ‘स्वयं गादिया’ असं अपहरण करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे(Kidnapped 10th standard student and demanded Rs 4 crore ransom).

    सध्या 10 वीच्या परीक्षा सुरुयत.स्वयं हा स्वतःच्या कारमध्ये कारचालकासह परीक्षा सेंटर असलेल्या पोद्दार शाळेत परीक्षेसाठी गेला होता. परीक्षा संपल्यानंतर कारमधून त्याचं अपहरण करण्यात आलं. परीक्षेची वेळ संपूनही स्वयं घरी न आल्यानं त्याच्या कुटुंबीयांनी कारचालकाला फोन करून विचारणा केली असता अपहरण कर्त्याने ‘चार कोटी आणून द्या,मुलाला घेऊन जा’ असं म्हटल्याचं कारचालकाने सांगितले.

    या नंतर अपहरण झालेल्या विद्यार्थ्याच्या वडिलांनी तातडीने तालुका जालना पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपासाची चक्रं वेगानं फिरवत सर्वत्र नाकाबंदी केली. या नाकाबंदी दरम्यान अंबड तालुक्यातील शहापूर येथे स्वयंच्याच कारचालकाने त्याचे अपहरण केल्याचं समोर आले. त्यामुळे पोलिसांनी अपहरण झालेल्या विद्यार्थ्याची सुटका करत करचालकाला ताब्यात घेतलं असून इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.