जालन्यात आई करत होती शेतात काम, चिमुकली झोक्यात झोपली होती; त्यांनी डाव साधला आणि…

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. सिल्लोड तालुक्यातील गव्हाणी गावातील डकले कुटुंब शेतीकाम करण्यासाठी निधोणा गावात आलेलं आहे.

    जालना :  झोक्यात झोपलेल्या एका दीड वर्षाच्या मुलीचं अपहरण (kidnapping of a one and a half year old girl) करण्यात आल्याची घटना जालन्यातील निधोणा (Nidhona in Jalana) गावच्या शिवारात घडली आहे. श्रावणी डकले (Shravani Dakle) असं अपहरण करण्यात आलेल्या दीड वर्षाच्या चिमुकलीचं नाव आहे. ही दीड वर्षाची चिमुकली झोक्यात झोपलेली असताना आणि तिची आई शेती काम करत असताना अज्ञाताने तिचं अपहरण केलं आहे.

    या घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. सिल्लोड तालुक्यातील (Sillod Taluka) गव्हाणी गावातील (Gavani Village) डकले कुटुंब शेतीकाम करण्यासाठी निधोणा गावात आलेलं आहे.

    आज सकाळी दीड वर्षाची चिमुकली झोक्यात झोपलेली होती. याच वेळी तिची आई शेतीकाम करत असताना हे अपहरण नाट्य घडलं. अपहरण की घातपात याचा तपास पोलिस करीत आहेत. घटना स्थळी श्वान पथक पाचारण करण्यात आले होते परंतु संबंधित श्वानालाही मग घेता आला नाही. कारण अपहरण झालेल्या बाळाला कडेवर घेऊन गेल्यामुळे पोलीस श्वानस मांग घेता आला नाही.