Criticism of Sanjay Raut on Kirit Somaiya

किरीट सोमय्या मुंबईतील अनेक बिल्डरांकडून खंडणी वसूल करतात. एका शेेअर ट्रेडिंग कंपनीकडूनही त्यांनी मोठा निधी घेतला असून राज्य सरकारकडून लवकरच त्यांची चौकशी सुरू होणार आहे असा गौप्यस्फोट शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे आहे. किरीट सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठान संस्थेमध्ये ब्लॅक मनी व्हाईट करण्याचा उद्योग चालतो. अनेक व्यवसायिकांनी या संस्थेला संशयास्पद देणग्या दिल्या आहेत, असा आरोप करत ईडीनेही या व्यवहारांची चौकशी करावी, अशी मागणी राऊत यांनी केली आहे(Kirit Somaiya's organization runs the business of laundering black money; Demand for ED inquiry from Sanjay Raut ).

    मुंबई : किरीट सोमय्या मुंबईतील अनेक बिल्डरांकडून खंडणी वसूल करतात. एका शेेअर ट्रेडिंग कंपनीकडूनही त्यांनी मोठा निधी घेतला असून राज्य सरकारकडून लवकरच त्यांची चौकशी सुरू होणार आहे असा गौप्यस्फोट शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे आहे. किरीट सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठान संस्थेमध्ये ब्लॅक मनी व्हाईट करण्याचा उद्योग चालतो. अनेक व्यवसायिकांनी या संस्थेला संशयास्पद देणग्या दिल्या आहेत, असा आरोप करत ईडीनेही या व्यवहारांची चौकशी करावी, अशी मागणी राऊत यांनी केली आहे(Kirit Somaiya’s organization runs the business of laundering black money; Demand for ED inquiry from Sanjay Raut ).

    मोठे प्रकरण उघडकीस आणणार असल्याचा दावा मंगळवारी संजय राऊत यांनी केला होता. त्यानुसार त्यांनी आज सोमय्यांच्या यांच्या इतर अनेक व्यवहारांवर शंका उपस्थित केली आहे. आज त्यांनी सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळणाऱ्या देणग्यांबाबत खुलासा केला. तर भाजपच्या २८ नेत्यांची प्रकरणे आपण उघड करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

    मोतीलाल ओसवाल कंपनीकडून किरीट सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानने लाखो रुपये लाटले, असा आरोप राऊत यांनी केला. एनएसईएलच्या ५६०० कोटी रुपयांच्या शेअर्स घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी केली होती. मोतीलाल ओसवाल कंपनीची या प्रकरणी ईडी ने चौकशीही केली.

    मात्र, स्वतः किरीट सोमय्या चौकशीसाठी कंपनीच्या शिपायांच्या घरी गेले. तमाशा केला व नंतर २०१८-१९ असे २ वर्ष सोमय्यांनी मोतीलाल ओसवालकडून लाखो रुपये युवक प्रतिष्ठानसाठी घेतले, असा आरोप संजय राऊत यांनी केला.